कला शिक्षकाची पदविका घेतलेल्या आदित्य पोराजवार या तरुणाला कलाकृतीसाठी साकारण्यासाठी लागले तब्बल 15 दिवस….
——————-
प्रतिनिधी :
——————-
अंगी विकसीत झालेले मला गुणांना श्रद्धेची जोड मिळाल्यास एक यशस्वी अविश्वासनीय कलाकृती बाहेर पडू शकते हेच वसमत येथील तरुण आदित्य पोराजवार यांने सिद्ध केले आहे. तब्बल ३२००० काळे व पांढरे प्लास्टिकचे मोती च्या साह्याने प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारली गेली. हीच प्रतिमा श्रीराम नवमी निमित्त वसमतकरांसाठी अद्वैत आकर्षण ठरली.

वसमत चे माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार यांचे चिरंजीव आदित्य पोराजवार यांनी नुकतेच नांदेड येथे कलाशिक्षक पदविका (ATD) उत्तीर्ण केले आहे. त्यामुळे चित्रकलेत परांगत झालेल्या आदित्य यांनी विविध देवदेवतांचे व महापुरुषांचे आकर्षक चित्र रेखाटले आहे. आदित्य व आदित्य यांचे कुटुंब श्रीराम भक्त असल्याने आगामी येणाऱ्या श्रीराम नवमी निमित्त श्रीरामाचे आकर्षक मोझँक प्रकारात चित्र साकार करण्याचे ठरवले. त्यानुसार आदित्य पोराजवार याने ३२००० काळे व पांढरे प्लास्टिकचे मोती खरेदी केले आणि मोझँकच्या या कलाप्रकारातील प्रतिमेची तयारी सुरू केली. प्रत्येक मोती शिकवण्यासाठी आदित्यला ३२००० वेळा हाताचा वापर करावा लागला. मात्र प्रभू श्रीरामाचे तेजस्वी रूप समोर आणत असताना कुठलाही थकवा त्याच्यासमोर आला नाही.
शेवटी तब्बल पंधरा दिवसानंतर मोझँक कला प्रकारातून श्रीरामाची आकर्षक प्रतिमा साकारले गेले. सदरील प्रतिमा डोळे दीपावणारी असून मनमोहक आहे. शुक्रवारी ता.२६ रोजी श्रीराम नवमी निमित्त वसमत शहरातील बोधानंद मठ, ब्राह्मण गल्ली येथील प्राचीन असलेल्या श्रीराम मंदिरासमोर लावण्यात आली होती. यावेळी दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी प्राचीन मंदिरातील श्रीरामाच्या दर्शना बरोबरच आदित्य यांच्या कलाकृती मधून तयार झालेल्या श्रीरामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. तसेच प्रत्येक भाविकांनी आदित्य याच्या कलाकृतीचे तोंडभर कौतुक केले.
श्रीरामाचे नामस्मरण आणि अतुट श्रद्धेने साकारली प्रतिमा…
३२००० मोती चिटकवताना ३२००० वेळा हात प्रतिमा तयार होण्याच्या दिशेने सरसावले होते. हे करत असताना मनात श्रीरामाचे नामस्मरण आणि हृदयात अतूट श्रद्धा यामुळे मी मन्याद्वारे श्रीरामाची प्रतिमा साकारू शकलो. हे केवळ प्रदर्शन नसून साधनेचे प्रतीक आहे.
कलाकार आदित्य श्रीनिवास पोराजवार, वसमत.


