
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले निवेदन..
——————–
प्रतिनिधी :
——————-
येत्या बुधवारी 8 ऑक्टोबर पर्यंत मागील वर्षीचा पोस्ट हार्वेस्टिंग चा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही तर येत्या 9 ऑक्टोबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समक्ष त्यांच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा शुक्रवार ता.३ शेतकरी नेते आलोक इंगोले यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदनाद्वारे दिला आहे .
मागच्या दीड महिन्यामध्ये जिल्हाभरामध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करण्यात यावी व सरकारने दिलेले कर्जमाफीची आश्वासन पाळून शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी ही मागणी आता जोर धरू लागली आहे. अशातच सततच्या अति पावसामुळे सर्व पिके उध्वस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे . मागच्या वर्षभरापासून सतत पाठपुरावा करून सुद्धा पिक विमा कंपनी व प्रशासन शेतकऱ्यांचा हक्काचा पिक विमा देण्यास विलंब करत आहे .या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना हक्काची पिक विमा रक्कम जर मिळाली तर निश्चितपणाने शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करण्यासाठी मदत होऊ शकते ; परंतु शासन, प्रशासन याबाबतीत गंभीर दिसत नाही त्यामुळे मागच्या आठवड्यात शेतकरी नेते आलोक इंगोले यांनी या राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हा कृषी अधिकारी यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यानंतर कृषिमंत्री यांनी येत्या आठ दिवसांत प्रलंबित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे आश्वासन देऊन आंदोलन थांबवण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला आंदोलनकर्त्यांनी मान देऊन आंदोलन काही दिवस पुढे ढकलले परंतु दिलेली मुदत संपत आलेली असताना सुद्धा प्रशासनाकडून हालचाली होताना दिसत नसल्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कृषी मंत्री यांना निवेदन दिले. येत्या आठ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रलंबित पीक विमा रक्कम वर्ग करण्यात आली नाही तर 9 ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा आलोक इंगोले यांनी निवेदनात दिला आहे .
