
पालावरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे केले वाटप…
वसमत,ता.६
येथील शिवेश्वर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा भाजपा नेते शिवदास बोड्डेवार यांचा वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
नेहमीच समाज कार्यात वाहून घेणारे राजकीय, सामाजिक नेते अशी ओळख असलेले शिवदास बोड्डेवार यांचा वाढदिवस साधेपणाने तसेच सामाजिक शैक्षणिक उपक्रमांतून व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार भटक्या समाजातील शाळाबाह्य मुलं असलेल्या पालावरच्या शाळेत आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थित सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना शिवदास बोड्डेवार यांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होऊन शिक्षणात अग्रेसर व्हावे तसेच देशाचा एक परिपक्व नागरीक बणून विविध क्षेत्रात नावलौकिक कमवावे असे ते म्हणाले. कार्यक्रमांसाठी माजी उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार, शहराध्यक्ष विष्णू बोचकरी,माजी नगरसेवक शिवाजी अलडिंगे,राजेश भालेराव, गोपाळ महाजन, बालाजी कासार, डॉ जिंतूरकर, संतोष हादवे,भगवान घाटोळ, गजानन चोंडेकर, लखन बोड्डेवार, गोविंद घुसे, बालू धोपटे,प्रविण पोफाळकर,श्रीनिवास ताटेवार, समर्थ वायचाळ,परसराम पुरी, सुशांत भिसे यासह कार्यकर्ते, पालावरील समाजबांधव उपस्थित होते.प्रास्ताविक राजेश भालेराव यांनी केले तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले.
