
तहसीलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी व ग्राहक संरक्षण विभागाची मोठी कारवाई…
*********
वसमत
*********
वसमत शहरात मागील काही दिवसांपासून घरगुती अवैध गँस भरणा केंद्राचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत नागरीकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यानुसार शुक्रवारी ता.३० दुपारी २ वाजता कारखाना रोडवरील अवैध गँस भरणा केंद्रावर छापा मारला असता ९ सिलेंडर, वजनकाटा, रिफिलिंग मशीन व अँटो असा १,८३,३५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती वापराच्या गँस सिलेंडरची काळया बाजारात विक्रीच्या व अवैध गँस भरणा केंद्राबाबत नागरीकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यानुसार तहसिलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे पथक तयार करण्यात आले होते. शुक्रवार ता.३० दुपारी २ वाजता सदरील पथकाने कारखाना रोडवरील अवैध गँस भरणा केंद्रावर अचानक छापा मारला. यावेळी ८ घरगुती गँस सिलेंडर, १ व्यावसायिक सिलेंडर, १ वजन काटा, तसेच गँस गँस भरणा करण्यासाठी लागणाऱ्या ३ गँस रिफिलिंग मशीन व एक अँटो असा एकुण १,८३,३५६ रुपयांचा मुद्देमाल अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या हाती लागला. विशेष म्हणजे अवैध गँस भरणा केंद्रावर एका अँटोमध्ये गँस भरताना पथकाने रंगेहाथ पकडले. अवैध गँस भरणा केंद्रावरील पुरवठा विभागाची पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. तहसिलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पांडुरंग हांडे, पुरवठा निरीक्षक बालाजी बोखारे, श्री चव्हाण यांचा या पथकात समावेश होता. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
काळया बाजारात सिलेंडर येतात कुठून…?
पुरवठा विभागाची घरगुती गँसच्या काळाबाजारावरील ही सर्वात मोठी कारवाई आहे. मात्र काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकांना घरगुती सिलेंडर कसे मिळते ? पुरवठा करणारी यंत्रणा कोणती याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. तरच अवैध घरगुती गँसचा काळाबाजार थांबेल.
