
प्राणी शास्त्र विषयात केले संशोधन…
***********
वसमत
***********
वसमत येथील अजय शिवलिंगराव हिवरे यांना स्वराती विद्यापीठाने प्राणीशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएचडी) प्रदान करुन सन्मानित केले आहे.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने, सायन्स महाविद्यालयातील प्राणीशास्त्र व मत्स्यशास्त्र विज्ञान संशोधन केंद्रातील अजय शिवलिंगराव हिवरे यांना नुकतीच प्राणीशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) प्रदान केली आहे. त्यांनी “बायोलॉजी ऑफ नोटोपटेरस चिताळा (हॅमिल्टन, 1822) फॉम नांदेड रिजन महाराष्ट्र” या विषयावर शोधप्रबंध विद्यापीठात सादर केला होता. यासाठी त्यांनी विभागप्रमुख डॉ. किरण शिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा शोधप्रबंध पुर्ण केला. तसेच आजपर्यंत त्यांचे (08) शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेले आहेत. सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे, उपप्राचार्या अरूणा शुक्ला, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य ई. एम. खिल्लारे तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. . ” शिव सकाळ” परिवाराच्या वतीने त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन….
