
शेतकर्यांच्या कर्जमाफीसह इतर आश्वासनांची पूर्तता करा , जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन
**********
वसमत :
**********
महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्यांच्या कर्जमाफीसह अनेक आश्वासने दिली होती; मात्र अद्यापपर्यंत शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली नाही. तर आश्वासनांचीही पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकर्यांना कर्जमाफीसह दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करण्यात यावे, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने गुरुवारी ता.५ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यामार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
हिंगोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केलेल्या मागणीनुसार शेतकर्यांची कर्जमुक्ती तात्काळ करण्यात यावी. यासह लाडक्या बहिणींना २१०० रूपये देण्यात यावे, ४५ हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधण्यात यावे, शेतकर्यांनी खरेदी केलेल्या खतावरील जीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करण्यात यावे, वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रूपये मानधन देण्यात यावे, शेतीसाठी चोवीस तास वीजपुरवठा करण्यात यावा, शेतमालाला हमी भाव देऊन बी-बियाणे, खतांचे दर नियंत्रित ठेवण्यात यावे, ग्रामीण भागातील नागरिकांना घरोघरी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, घरकुलाच्या तुटपूंजा अनुदानात वाढ करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी हिंगोली जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, माजी खासदार अॅड.शिवाजी माने, माजी आमदार डॉ.संतोष टारफे, सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे, शिवसेना महिला जिल्हप्रमुख डॉ सौ रेणुका पतंगे, शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख सौ मीरा ताई पांचाळ, शिवसेना महिला शहरप्रमुख सौ संगीता ताई स्वामी, शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे, डी.के.दुर्गे, उपजिल्हाप्रमुख (प्रशासकीय) उद्धवराव गायकवाड, विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे, चंद्रकांत देशमुख, उपजिल्हा संघटक शंकर घुगे, जिल्हा प्रवक्ता विठ्ठल चौतमल, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, आनंदराव जगताप, संतोष देवकर, सखाराम उबाळे, युवासेना राज्य विस्तारक दिलीप घुगे, गोविंद मुटकुळे, पिंटू गुजर, मारोतराव खांडेकर, अमोल काळे, शिवाजी कर्हाळे, माधव भवर, नारायण घ्यार, अनिल कर्हाळे, भगवान पठाडे, आकाश कर्हाळे, आनंद खांडेकर, गंगाधर कर्हाळे, अरविंद कर्हाळे, श्रावण राठोड, शंकर भवर, माधव पाटील, केदारलिंग कर्हाळे, जगन लडे, बालाजी करडिले, चंद्रशेखर उबाळे, पराग अडकिणे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते
