
शिवाचार्य रत्न विभूषित श.ब्र.108 गुरुवर्य साब शिवाचार्य महाराज यान्चे हजारो भाविकानि अंत्यदर्शन घेऊन वाहिली श्रद्धांजली…
—————-
वसमत : प्रतिनिधि –
—————-
येथील थोरला मठ संस्थानचे मठाधिपती शिवाचार्यरत्न विभूषित ष.ब्र.१०८ गुरुवर्य सांब शिवाचार्य महाराज हे वयाच्या ९४ व्या वर्षी वृध्दापकाळाने मंगळवारी ता.१७ सकाळी लिंगैक्य झाले. त्यांचा समाधी सोहळा सायंकाळी ४ वाजता असंख्य वीरशैव लिंगायत शिष्यगणांच्या उपस्थितीत व शिवाचार्यांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाला. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिष्यगण व भाविकांनी शोभायात्रेत सहभागी नोंदवून महाराजांचे अंत्यदर्शन घेत श्रध्दांजली वाहिली.
शिवाचार्यरत्न ष.ब्र. १०८ गुरुवर्य सांब शिवाचार्य महाराज लिंगैक्य झाल्याची माहिती मिळताच महाराष्ट्रात विखुरलेल्या वीरशैव लिंगायत शिष्यगण व भाविक हजारोंच्या संखेने वसमत येथे आले. अत्यंदर्शनासाठी थोरला मठ येथे एकच गर्दी उसळली होती. सकाळपासून वीरशैव लिंगायत समाजासह विविध क्षेत्रातील समाज बांधवांनी महाराजांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मठाधिपती वेदांतचार्य श दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांची अंत्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भजनी मंडळासह शहरातील भाविक नागरीक मोठया संखेनं उपस्थित होते. तर महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. ठिकठिकाणी व्यापारी, राजकीय, सामाजिक मंडळींनी अंत्यदर्शन घेत पुष्पांजली वाहिली. सायंकाळी ४ वाजता थोरला मठ येथे समाधी सोहळा सुरु झाला. या वेळी मठाधिपती दिगंबर शिवाचार्य महाराज, सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेडा, महादेव शिवाचार्य महाराज वाईकर, लासीन मठाचे मठाधिपती करबसव शिवाचार्य महाराज वसमत, गुरुविरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानुरकर, गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव, यासह शिवाचार्यांच्या मंत्रोच्चारात भावपुर्ण समाधी सोहळा संपन्न झाला.
