
वसमतला राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) कार्यकर्ता मेळावा संपन्न…
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परीषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मित्र पक्षाचा झेंडा फडक्ण्यासाठी आक्रमक व्हा….
—————–
प्रतिनिधी :
—————–
आजच्या स्थितीत गोरगरीबांचा आवाज दाबल्या जातोय, जनतेच्या खर्या प्रश्नाकडे डोळेझाक केली जाते . यासाठी राष्ट्रवादी पुन्हा ताकदीने उभी करुन एक माणूस केंद्रीभूत राजकारण मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असे आवाहन माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी गुरुवार ता.१९ केले. ते वसमत येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालयात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, माजी आमदार पंडीतराव देशमुख, माजी सभापती राजेश पाटील इंगोले , अँड .रामचंद्र बागल , ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाषराव
लालपोतू ,विनोद झवर , मंजूर मौलाना , शिवाजी पांचाळ ,बाळासाहेब कीर्तने ,
शेख करीमोद्दीन , प्रा.बि.डी कदम ,राजेश डुकरे ,
महिला जिल्हाध्यक्षा रत्नमालाताई शिंदे , माजी उपनगराध्यक्ष इंदिराबाई साखरे , नजीमा सय्यद ,जरीना बेगम ,एम .डी .अंबोरे ,शंकरराव इंगोले ,नितीन महागावकर ,सुरेश आहेर ,मदनराव कर्हाळे,
रमेशराव सानप ,दिलीपराव राखोंडे ,शेख आयुब पापुलर ,प्रा .गणेश कमळू ,दिलीपराव पुंडगे ,बाबुराव दळवी ,संकेत इंगोले ,श्याम कदम ,दौलत हुबांड ,विठ्ठल गायकवाड ,संभाजी चव्हाण ,ऑड .शेख मोहसीन यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपली आगामी राजकीय भूमिका मांडली. यानंतर माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते सरकारवर टिका करतात म्हणाले की, या सरकारमध्ये योजना पोहचत नाहीत. पोहचल्या तर त्याची किंमत मोजावी लागते.दलालामार्फतच ह्या योजना पोहचतात. ७ ते ८ गोरगरीबांच्या कल्याणाच्या योजना बंद पडल्यात पण त्याची साधी वाच्यता ही केली जात नाही. लाडकी बहिण योजनेला ४५ हजार कोटी रुपये लागतात आणि वीज बील मराठीला २० हजार कोटी रुपये लागतात. या ६५ हजार कोटी रुपयांच्या योजनेत सरकारचे कंबरडे मोडून गेले असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात जवळपास ३०० जल जिवन योजना आल्या परंतू कुठे पाणी आले का ते पहावे. कोट्यावधीं रुपयांच्या ह्या योजना आहेत पण नळाला पाणी येत नाही. केवळ विकासाचे ढोंग दाखवून काम सुरु असल्याचे दांडेगावकर म्हणाले. मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सुचना केल्याप्रमाणे पदाधिकारी संघटनेत बदल करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. ज्यांच्याकडे पद असून काम करीत नाहीत अशांचा विचार करुन एक आक्रमक टिम तयार करु असे म्हणाले. आगामी निवडणुकीत ज्याला समाजासाठी काम करायचं अशांना तिकीट देऊन संधी दिली जाईल. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि दर्जेदार नेतृत्व उभं करण्यासाठी सर्वांना आक्रमक रहावं लागेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व मित्र पक्ष पुर्ण ताकतीने काम करेल असेही शेवटी श्री दांडेगावकर म्हणाले. सुत्रसंचलन प्रकाश इंगळे यांनी केले तर आभार यलाप्पा मिटकर यांनी मानले. मेळाव्याला पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
