
वसमत येथील ‘स्वरोहम’ संगीत विद्यालयाचे यश…
——————–
प्रतिनिधी :
——————-
अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन परीक्षा प्रवेशिका पूर्ण या परीक्षेत अनुष्का कबाडे हिने प्रथम क्रमांक पटकवित विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाली आहे.
वसमत येथील” स्वरोहम “संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का सुनील कबाडे हिने शास्त्रीय गायनातील चौथी परीक्षा प्रवेशिका पूर्ण एप्रिल २०२५ ही परीक्षा विशेष प्राविण्यासह अनंत अभिनव केंद्रातून प्रथम आली आहे. एप्रिल सत्रात ९ विद्यार्थी प्रवेशिका पूर्ण या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून यामध्ये
अनुष्का कबाडे प्रथम, आर्या सरदेशपांडे द्वितीय तर मनुश्री इनामदार हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
मध्यमा प्रथम(४थे वर्ष)परीक्षेत ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये
अंबरीश पांडे-प्रथम तबला,
विराट साळवे-प्रथम हार्मोनियम
सर्वेश आंबेकर-प्रथम गायन उत्तीर्ण झाले आहेत.
एप्रिल सत्राचा १०० टक्के निकाल लागला असून सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
गेली 10 वर्ष झाली स्वरोहम संगीत विद्यालय वसमत शहरात चालू असून अनेक विद्यार्थी गायन वादन क्षेत्रात गुणवंत होऊन संगीत विशारद ही पदवी प्राप्त करत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे
संचालक लक्ष्मीकांत धानोरकर ,
दीपक पांचाळ , लक्ष्मीकांत जोशी धानोरकर , दीपक पांचाळ व केंद्र संचालक उमाकांत पैंजणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यशस्वी विद्यार्थिनीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे
