
आशुतोष चिंचाळकर दिड वर्षांनंतर पुन्हा वसमत न.प. चे मुख्याधिकारी….
———————
प्रतिनिधी :
——————–
वसमत नगर परिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांची अचानक बदली झाल्यानंतर आशुतोष चिंचाळकर यांची मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवार ता.२५ आशुतोष चिंचाळकर यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे. विशेष म्हणजे केवळ दिड वर्षांच्या कालावधीत आशुतोष चिंचाळकर यांची वसमत नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून डबल एन्ट्री झाली आहे.
आशुतोष चिंचाळकर हे पालम नगर पंचायत येथे मुख्याधिकारी पदी नियुक्त होते. विशेष म्हणजे त्यांची दिड वर्षापुर्वी वसमत येथून बदली झाली होती. मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांची अचानक तडकाफडकी बदली झाल्यानंतर रिक्त जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. श्री सुंकेवार यांच्या केवळ दिड वर्षांचा कालावधी पुर्ण होत असताना तडकाफडकी बदलीचे कारण मात्र समजू शकले नाही. बुधवारी ता.२५ आशुतोष चिंचाळकर यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला. या वेळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक धोंडीराम दळवी, नितीन चव्हाण, नागनाथ देशमुख, दाजीबा भोसले, शेख जुबेर, अरविंद शिकारी, सुभाष कदम आदींनी पुष्पगुच्छ देऊन श्री चिंचाळकर यांचे स्वागत केले. आगामी नगर परिषदेची निवडणूक पाहता या घडामोडींला महत्व आले आहे.
दरम्यान निलेश सुंकेवार यांच्या अल्प कार्यकाळातील विकास कामांमध्ये पाणीपुरवठा सुधारणा, चौक सुशोभीकरण, रस्ते विकास , अतिक्रम हटाव मोहिम, कै सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण यासह इतर विकासात्मक कामाचा समावेश आहे.
