
वसमत तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर , काही ठिकाणी जैसे थे तर काही ठिकाणी पुर्वीच्या आरक्षणात बदल…
प्रतिनिधी :
——————–
वसमत तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीचे प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत तहसिलदार शारदा दळवी यांच्या उपस्थितीत बुधवार ता.२ सुरमणी प्रा दत्ता चौगूले सांस्कृतिक सभागृहात काढण्यात आली. यात प्रामुख्याने बाभुळगाव, आंबा, हयातनगर, कुरुंदा, आरळ, हट्टा ही मोठी गावे आरक्षित झालीत तर गिरगाव, आसेगाव, कौठा सह इतर मोठी गावे सोडती मध्ये खुला प्रवर्गात आहेत.
पुर्वी काढण्यात आलेली सरपंच आरक्षण सोडत रद्द ठरवल्यानंतर दुसर्यांदा प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे गाव स्तरावर आरक्षणाबाबत राजकीय मंडळींमध्ये धाकधुक होती. अनेक गावात पुर्वीच्या आरक्षणात बदल झाला आहे तर अनेक गावात जैसे थे आरक्षण आहे.
खर्च केलेल्या सरपंचपदाच्या उमेदवारांना धक्का….
गावचा सरपंच होण्यासाठी मागील चार-पाच वर्षांपासून विविध सामाजिक कार्य . कार्यकर्ते , लोकांना सांभाळण्यात लाखोंचा खर्च केलेल्या उमेदवारांना आरक्षण सोडतीने धक्का दिला. नेमकं गाव आरक्षित झाल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याची रंगीन चर्चा सोडतीच्या ठिकाणीं सुरू होती.
११९ ग्रामपंचायतीचे प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :-
अनुसूचित जाती प्रवर्ग – पाथर्डी खुर्द , माळवटा, कुडाळा, पांगेरा शिंदे, दारेफळ, महागाव, परळी, मरसुल तर्फे सेंदुरसना, चोंढी तर्फे सेंदुरसना तर अनुसूचित जाती महिला राखीव मध्ये तेलगाव, वाघी, माटेगाव, सांवगी बु. , आडगाव, बाभुळगाव पळसगाव तर्फे माळवटा, ब्राम्हणगाव बु, कुपटी, पुयणी बु, यांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात जवळा तर्फे बाभुळगाव व ढवूळगाव तर महिला राखीव मध्ये आंबा, भेंडेगाव चा समावेश आहे.
नागरीकांचा मागास प्रवर्ग – कोडगाव, गुंज, डोणवाडा, थोरावा, दगड पिंपरी, पांगरासती , भोगाव, मरलापुर, मुडी, रायवाडी, रेणकापूर, लिंगी, लोळेश्वर, सुकळी, हयातनगर, हापसापुर. ना.मा.प्र.महिला आरक्षित – पार्डी बु, बोरगाव बु , कुरुंदा, आरळ, सोन्ना तर्फे हट्टा, बोराळा, वाखारी, पिंपळगाव कुटे, भोरीपगाव, पिंपळा चौरे, लहान, कळंबा, लोण बु ,हट्टा, विरेगाव, अकोली या गावाचा समावेश आहे.
खुला प्रवर्ग : सेलू, कुरुंदवाडी, पळशी, रांजोना , धानोरा तर्फे आरळ,पुयणी खु, सातेफळ तर्फे आरळ, करंजाळा, धामणगाव, खुदनापुर, गिरगाव, पारवा, वापटी, सारोळा, परजना , बोरगाव बु , सोमठाणा, जुनूना, आसेगाव, कानोसा, महमदपुरवाडी, शिरळी, किन्होळा, सुनेगाव, रिधोरा, मोहगाव, दगडगाव, हिरडगाव, करंजी, गणेशपुर, कौठा, तुळजापुरवाडी.
खुला प्रवर्ग (महिला) – खापरखेडा, कागबन, जवळा बु, इंजनगाव, हिवरा खु, राजापुर, कन्हेरगाव, रुंज, सिंगी, रोडगा, बळेगाव, चिखली, रेवूलगाव, नहाद, मुरुंबा बु, वाई त. , कोठारी, कोर्टा, खांडेगाव, डिग्रस खु , बोरीसावंत, गुंडा, दाभडी, एकरुखा, टाकळगाव, कोनाथा, टेंभूर्णी, पांग्रा, म्हातारगाव, राजवाडी, पिंपराळा, खांबाळा गावांचा समावेश आहे.
