
लोकप्रिय ताकतवर ओबीसी चेहरा मिळाल्याने शिवसेना शिंदे गटाची ताकत वाढणार…
—————-
प्रतिनिधी :
—————-
वसमत येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ मारोती क्यातमवार यांनी अखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात जाहिर प्रवेश केला. बुधवार ता.२ मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश झाला.
डॉ मारोती क्यातमवार हे मागील अनेक वर्षापासून कांग्रेसचे सक्रीय नेते आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी पक्ष वाढीबरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत विविध सामाजिक उपक्रम राबविले. गोरगरीब व वंचितांचा मदतनीस म्हणून त्यांची वसमत मतदारसंघात सर्वदूर ख्याती आहे. तसेच विरोधी पक्ष म्हणुही विविध प्रश्नांना वाचा फोडीत त्यांचे विकासकामात महत्वाचे योगदान राहिले आहे. मात्र राज्यस्तरावरील राजकीय गटतट व फेरबदलाममुळे ते अस्वस्थ होते. महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर काही महत्वाचे राजकीय निर्णय घेणे कठीण झाले होते. ओबीसीचा एक लोकप्रिय व ताकतवर चेहरा असताना त्यांना महाविकास आघाडी मधून संधी मिळत नव्हती. त्यामुळे त्यांची राजकीय अस्वस्थता होती. अखेर त्यांनी मतदारसंघाचा, नागरीकांचा विकास करण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी बुधवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात जाहिर प्रवेश केला. यावेळी कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, वसमत तालुकाप्रमुख राजु चापके यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. डॉ मारोती क्यातमवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला वसमत विधानसभा मतदारसंघात लोकप्रिय व ताकतवर ओबीसी नेता मिळाला आहे. परिणामी आगामी काळात शिवसेना शिंदे गटाची वसमत मतदारसंघात राजकीय ताकत वाढली आहे.
विकासासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश – डॉ मारोती क्यातमवार
वसमत मतदारसंघाचा व सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी शिवसेना शिंदे गटात जाहिर प्रवेश केल्याचे डॉ मारोती क्यातमवार यांनी सांगीतले.भविष्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाप्रमुख राजु चापके यांच्या मदतीने वसमत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ क्यातमवार यांनी सांगितले.
