
वसमत रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकास मागण्यांचे निवेदन…
——————–
प्रतिनिधी :
——————-
पूर्णा ते अकोला मार्गे ट्रेन क्रमांक १७६०५/०६ काचीगुडा भगत की कोठी या नवीन सुरू झालेल्या रेल्वेला वसमत स्थानकावर थांबा देण्यात यावा तसेच सदरील रेल्वेचे मिनाक्षी एक्सप्रेस असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी वसमत रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकाद्वारे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना मंगळवारी ता.२२ देण्यात आले .
प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने काचीगुडा ते पूर्णा जंक्शन, अकोला जंक्शन इंटारसी, जंक्शन उज्जैन, अजमेर मार्गे भगत की कोठी अशी दैनंदिन रेल्वे सुरू केली आहे. वसमत रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी मागणी या मागणीची दक्षिण मध्य रेल्वेने दखल घेतली आहे. याची प्रवासी आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र या रेल्वेला वसमत येथे थांबा द्यावा अशी मागणी व्यापारी व सामान्य रेल्वे प्रवाशांकडून होत आहे .
वसमत स्टेशन हे नांदेड विभागाच्या पूर्णा जंक्शन आणि अकोला जंक्शनमध्ये येत असून पूर्णा पासून सुमारे २६ किमी अंतरावर आहे . वसमत येथे मोठी बाजारपेठ असून जिल्ह्याचे व्यवसाय केंद्र म्हणून ओळख आहे. तसेच शेतीमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्याने बाजार समितीची वार्षिक उलाढाल ५००० कोटींहून अधिक आहे. वसमत तालुक्यात ३ साखर कारखाने कार्यरत असून वसमत हे हळद आणि केळी, सोयाबीन आणि इतर कृषी उत्पादनांचे मोठे व्यापारी केंद्र आहे. त्याबरोबरच देशातील पहिले हळद संशोधन केंद्र आहे.त्यामुळे सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेला हा तालुका आहे.
तिरुपती, हिंगोली हजूर साहिब नांदेड, पुणे, विशेष रेल्वे, त्यानंतर वसमत रेल्वे स्थानकावर सुपर फास्ट ट्रेन थांबे देण्यात आले आहेत, अमरावती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , जन शताब्दी एक्सप्रेस, हैदराबाद जयपूर एक्सप्रेस, श्री गंगानगर अहमदाबाद व्हाया, काचेगुडा नरखेड, अकोला इंटरसिटी एक्सप्रेस, अमरावती अकोला-तिरुपती, वेळोवेळी धावणाऱ्या जवळजवळ सर्व गाड्यांना वसमत येथे थांबा आहे. परिणामी रेल्वेचे उत्पन्न वाढण्याबरोबरच प्रवाशांनाही त्याचा फायदा होत आहे. मात्र नव्याने सुरू झालेल्या काचिगुडा भगत की कोठी या रेल्वेला वसमत येथे थांबे देण्यात आलेला नाही. रेल्वे प्रशासनाने याचा विचार करुन सदरील रेल्वेला वसमत येथे थांबा द्यावा अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे वसमत स्थानकावरुन अजमेर येथील दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रवासी जातात, त्याचबरोबर इंदूर उज्जैन येथे जाणारे बरेच व्यापारी प्रवासी आहेत. मिलवाडा येथे घाऊक कापड बाजार असल्याने वसमतयेथील कापड व्यापाऱ्यांना मिनवाडा येथे जाण्याची सोय होईल.
तसेच हैदराबादमध्ये अपोलोसह इतर नामांकित रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांची मोठी संख्या असल्याने त्यांची मोठी सोय होणार आहे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष दिपक कुल्थे, कार्याध्यक्ष नविन चौकडा , संघटक जगदिश मोरे , उपाध्यक्ष धनंजय गोरे , सचिव साईनाथ पतंगे , सहसचिव , आशिष पवार, सदस्य सोपान काळे , सागर दलाल , सचिन बोबडे , आशिष दलाल , अमोल पटवे ,रिजवान खान आदींच्या च्या स्वाक्षऱ्या आहेत .
