
नागपुर येथील प्राकृतिक तज्ञ डॉ हरिष गडवाल व त्यांच्या टीमचा सामाजिक उपक्रम, ३० तारखेपर्यंत चालणार शिबिर
——————–
प्रतिनिधी :
——————–
नामांकित रुग्णालयात जाऊन लाखों रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करण्याबरोबरच मानसिक व शारीरिक झळ सहन करणार्या असंख्य नागरीकांना दिलासा मिळत आहे. नागपुर येथील प्राकृतिक तज्ञ डॉ हरिष गडवाल व त्यांच्या टीमच्या वतीने वसमत शहरातील बँक काँलणीतील गजानन महाराज मंदिरात सुरु असलेल्या अँक्युप्रेशर व चुंबकीय उपचार शिबिरात असंख्य रुग्ण उपचार करुन घेत आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुठलाही खर्च नसून केवळ १०० रुपये नोंदणी वर ही सेवा सुरु आहे. ३० तारखेपर्यंत हे शिबिर सुरु राहणार असून शहर व तालुक्यातील रुग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ हरिष गडवाल यांनी केले आहे.
वसमत शहरातील बँक काँलणीतील गजानन महाराज मंदिरात २१ जुलै ते ३० जुलै पर्यंत अँक्युप्रेशर व चुंबकीय उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नागपूर येथील प्राकृतिक तज्ञ डॉ हरिष गडवाल व त्यांची टीम उपस्थित झाली आहे. शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाला दिलीप माळवटकर, डॉ केशवराव लुटे, शामराव कुरुंदकर, शामराव बिडकर, सुधिर नामले, मधुकरराव वाढवणकर, बेबीताई धोंडे, रोहिणी धोंडे, रेणूका कार्ले, शिवाजी गुडेवार, गायत्री पाठक, सुमन मिरकुटे,गोवर्धन मिरकुटे, शिल्पा दलाल,शिवानी भुमरे आदींची उपस्थिती होती. सदरील शिबिर प्रतिदिन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू आहे.
उपचार….
दमा, गाठी, रक्तदाब, बवासीर, डायबिटीस, लकवा, कंबर, पाठ, मानेचे विकार, स्पाँडिलईटीज, अर्थरायटीज, गुडघादुखी, पोटाचे आजार, लैंगिक आजार, महिलांचे आजार, यासह इतर विविध आजारांवर उपचार सुरू आहेत.
विविध आजारांच्या रुग्णांनी निःशुल्क असलेल्या प्रकृतिक उपचारासाठी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ हरिष गडवाल यांनी केले आहे.
