
शेकडो वीरशैव लिंगायत समाज बांधवांची कार्यक्रमाला उपस्थिती, सोमवारी महाप्रसादाने अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता…
———————–
प्रतिनिधी :
———————-
येथील सिध्देश्वर मंदिर लासिन मठात प्राचिन परंपरा असलेला ७५७ वा बिल्वार्चन सोहळा रविवार ता.१० असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावर्षी लिंगैक्य ईश्वर शिवाचार्य महाराज यांच्या आशिर्वादाने व मठाधिपती गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज यांच्या सानिध्यात कारंजा (लाड) येथील सदगुरू मरळसिध्द शिवाचार्य महाराज यांना बेल चढवण्यात आला.
श्रावण महिन्यात लासिनमठ संस्थान सिध्देश्वर मंदिरात भाविकांची विविध धार्मिक कार्यक्रम व दर्शनासिठी मोठी गर्दी असते. यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक उपस्थित होतात. ४ आँगस्ट रोजी शिवनाम सप्ताहास सुरुवात झाली. शिवनाम सप्ताह कालावधीत सकाळ ते संध्याकाळ विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच नामांकीत किर्तनकार व प्रवचनकार यांचे किर्तन, प्रवचन व महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होते. तर वसमतचे ग्रामदैवत असलेल्या सिध्देश्वर मंदिरात अभिषेक करण्यासाठी सकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री उशीरापर्यंत भाविकांची गर्दी आहे.
रविवारी ता.१० ऐतिहासिक परंपरा असलेला ७५७ वा बिल्वार्चन सोहळा वैदीक मंत्रोच्चारात व मोठया उत्साहात शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावर्षी कारंजा लाड येथील सदगुरू मरळसिध्द शिवाचार्य महाराज यांना बेल चढवण्यात आला. रात्री ११ ते सकाळी २ पर्यंत हा सोहळा चालला. यावेळी सदगुरू करबसव शिवाचार्य महाराज यांच्या सानिध्यात माहेश्वरमुर्ती मंधप्पा स्वामी महाराज बोरावेकर, भुषण स्वामी वाखारीकर, विश्वनाथ स्वामी बेंडके,महादेव स्वामी आसेगावकर, गजानन स्वामी, संदिप स्वामी कासारखेडा यांनी वैदीक मंत्रोच्चार केला. महाआरतीने बिल्वार्चन सोहळयाची सांगता झाली. तत्पूर्वी कार्यक्रमाला गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज यांच्यासह थोरला मठाचे मठाधिपती वेदांतचार्य डिगांबर शिवाचार्य महाराज, सदगुरू रामलिंग शिवाचार्य महाराज पारंडकर, सदगुरू शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरुर अनंतपाळ आदींची उपस्थिती होती. उपस्थित गुरुवर्यांचे गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज यांनी स्वागत केले. तसेच सोनबाजी शिराळे गुरुजी यांचे किर्तन संपन्न झाले. बेलपत्राची व्यवस्था गुंज येथील भाविकांच्या वतीने करण्यात आली होती.
सोमवार ता.११ अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता महाप्रसादाच्या कार्यक्रमाने झाली. सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वस्थ कार्यकरणी मंडळ, सिध्देश्वर भजनीं मंडळ, सिध्देश्वर महिला मंडळ, वीरशैव तेलीमठ, थोरलामठ वसमत यासह वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी पुढाकार घेतला.
