
फुलसिंग नाईक विघाल्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा….
—————–
प्रतिनिधी :
—————–
वसमत शहरातील फुलसिंग नाईक विघाल्यात शुक्रवार ता.१५ आँगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमजद खान उर्फ नम्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शुक्रवार दिनांक १५ आगस्ट रोजी देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन भरपावसात उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अमजद खान उर्फ नम्मू यांच्या हस्ते फुलसिंग नाईक उर्दू व मराठी विघाल्यात सकाळी स्वतंत्र रित्या ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस सेवानिवृत्त नायब तहसीलदार शेख करिमोद्दीन ,माजी नगरसेवक रफिऊल्ला खान, वरिष्ठ पत्रकार शरीफ आलम,शौकत बेग, युवा नेते मजीद इनामदार,कलीम पठाण,मौलना म.फारूक, फेरोज खान,अजमत खान ,युनूस बेग, अब्दुल रहीम ,अजहर पठाण,विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास राठोड, इसाक पठाण ,सादेक अहमद खान ,शेख जाकेर , शेख हारून,नाजेर अहमद खान, आरेस अहमद ,आवेस सर, झेबा मॅडम,जयबुन्निसा मॅडम, रेश्मा मॅडम,
मराठी माध्यमाचे शिवाजी राठोड ,
यादव वैदे,देवराव कांबळे,दीपक रन्मले,शेख सलीम,माया भोसले मॅडम,रामकिशन जमदाळे,दीपक गोरे,संतोष रन्मले, तुकाराम बेले. सुंदर जाधव,गजानन काळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गासह
पालक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच स्वातंत्र्य दिना विषयी उर्दू ,मराठी , इंग्रजी या तिन्ही भाषेत मनोगत व्यक्त केली. पहाटे पासूनच मुसळधार पाऊस पडत असताना सुद्धा विघार्थ्याचा उत्साहात काही कमतरता भासत नव्हती.भरपावसात गणवेशात विघार्थ्यानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
