
प्रदुषणाचा धोका टाळण्यासाठी नगर परीषदेचा पुढाकार..
——————–
वसमत :
——————–
शनिवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी नगर परिषदेच्या वतीने वसमत शहरात चार ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार करण्यात आले असून विविध गणेश मंडळांनी जवळच्या कृत्रिम जलकुंडात श्री चे विसर्जन करावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आशुतोष चिंचाळकर यांनी केले आहे.
वसमत शहरात जवळपास प्रत्येक नगर व वसाहतीमध्ये श्री ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक घरामध्ये भाविकांनी मनोभावे श्री ची स्थापना केली आहे. गणपतीची संख्या पाहता विसर्जनासाठी उघडी नदी, दगडगाव रोड, कौठा रोड वरील खदानी तसेच विहिरीचा वापर केला जातो. यामुळे नदीचे, विहिरीचे प्रदुषण वाढते. त्याबरोबरच लांबच्या मिरवणूकीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी नगर परीषदेने पुढाकार घेत शहरात विविध चार ठिकाणी कृत्रिम मोठे जलकुंड तयार केले आहेत. यामध्ये बहिर्जी नगर हनुमान मंदिर, बँक काँलणी गजानन महाराज मंदिर, सुवर्णकार काँलणी संत नरहरी महाराज मंदिर व पाटील नगर रोड चन्ने काँलणी बसस्टँडच्या पाठीमागे या ठिकाणचा समावेश आहे. त्याबरोबरच निर्माल्य संकल़ करण्यासाठी जलकुंडाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. शहरातील सर्व गणेश मंडळांनी तसेच श्री ची घरी स्थापणा केलेल्या भाविकांनी आपल्या श्री चे विसर्जन नगर परीषदे मार्फत केलेल्या जलकुंडामध्ये करावे असे आवाहन नगर परीषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आशुतोष चिंचाळकर यांनी केले आहे.
