
सुरमणी प्रा दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात आयोजन, नामवंत कवी, किर्तनकार व वक्त्यांची उपस्थिती..
———————
प्रतिनिधी :
———————
प्राचार्य रावसाहेब पतंगे यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त वसमतनगर येथे प्रति वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी काव्य मैफिलीचे आयोजन बुधवार ता. १० सुरमणी प्रा दत्ता चौगूले सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे . यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, किर्तनकार व वक्ते उपस्थित राहणार असून वसमतकर रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कवींच्या जुगलबंदीचा स्वाद घ्यावा असे आवाहन प्राचार्य रावसाहेब पतंगे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कवि नारायण पुरी, सुप्रसिद्ध वक्ते, कीर्तनकार, कवी अविनाश भारती यांच्या मार्गदर्शनाखाली एजाज शेख (अकोला), बंडू सुमण अंधेरे (मुंबई), विशाल मोहिते (बुलढाणा) तर चाडेकरी रविंद्र केजकर (उस्मानाबाद) आदी मान्यंवर कवी उपस्थित राहणार आहेत.
प्रतिवर्षी ह्या काव्यमैफिलीने काव्य रसिकांची मने जिंकली आहेत. प्राचार्य रावसाहेब पतंगे स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पतंगे सरांचे माजी विद्यार्थी दरवर्षी या काव्य मैफिलीचे आयोजन करत असतात. मागील सतरा वर्षापासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम वसमत शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनलेला आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काव्यमैफिलीचे उद्घाटक कण्यात येणार आहे. सदरील काव्यमैफिलीचा वसमतकर रसिकांनी मनमुराद स्वाद घ्यावा असे आवाहन प्राचार्य रावसाहेब पतंगे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश इंगळे, प्रतिष्ठानचे यलाप्पा मिटकर, गजानन पाठक, प्रवीण शेळके, सिताराम म्यानेवार, जितेश लोलगे, राजा कदम, पांडुरंग बोराडे, प्रेमानंद शिंदे, प्रा.डॉ. विशाल पतंगे तसेच गंगामाई शिक्षण प्रसारक मंडाच्या वतीने करण्यात आले आहे.
