
वसमत तालुका मराठा सेवा संघाची नुतन पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर…
———————-
प्रतिनिधी :
———————
मराठा समाजाचा सर्वांगीण विकास आणि समाजाच्या समस्यांची सोडवणूक या परिवर्तनशील भूमिकेतून कार्य करण्याच्या उद्देशाने नुतन कार्यकारिणीच्या निवडीसाठी शहरातील लिटल किंग्ज शाळेत रविवारी ता.१४ बैठक संपन्न झाली. या बैठकीत वसमत तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत लोंढे तर उपाध्यक्षपदी मंचकराव काळे, अँड दिग्विजय चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याचबरोबर सेवा संघाच्या इतर निवडीमध्ये सचिव पदी परमेश्वर गरुड, कार्याध्यक्ष प्रा नंदकुमार सवंडकर, संघटक दिपक कदम, प्रवक्ता ज्ञानराज कदम, सहसचिव श्रीनिवास शिंदे तर सदस्यांमध्ये मंचक भोसले, गुणाजी ढोरे, वसंतराव मगर, रोहिदास मगर, ज्ञानेश्वर जाधव, महेश काळे, मदन सावंत, संतोष इंगोले, अर्जुन इंगोले प्रा. गंगाधर भोसले -प्रसिद्धी प्रमुख आदींची निवड करण्यात आली आहे.
बैठकीसाठी तानाजीराव भोसले, शंकरराव कदम, प्रा नामदेव दळवी, सतीश जाधव महागावकर, पुंडलिकराव बहिरे, प्रवीण दळवी आदींची उपस्थिती होती. सतीश जाधव महागावकर यांनी प्रास्ताविक करताना कार्यकारिणीच्या पुढील भूमिका व जबाबदारीवर प्रकाश टाकला. शंकरराव कदम यांनी कार्यकारणीसह उपस्थित मराठा बांधवांना मराठा सेवा संघाची भूमिका व आचारसंहिता याविषयी मार्गदर्शन केले. तर ही आचारसंहिता काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सर्वांनी पाळावी अशी भूमिका पुंडलिक बहिरे यांनी मांडली.
तानाजीराव भोसले यांनी वसमत तालुका मराठा सेवा संघाच्या प्रत्येक घटकांनी आपल्या पदाचा विचार न करता स्वतःला समाजासाठी वाहून घेतले तर निश्चितपणे समाजात आपली ओळख निर्माण होईल. त्यामुळे आपली कर्तव्य व जबाबदारी हीच आपली ओळख समजून मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य तत्पर राहुन कार्य करा. मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासह शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी तत्पर राहा अशी भूमिका मांडली. सुत्रसंचलन सतीश पाटील महागावकर यांनी केले.आभार चंद्रकांत लोंढे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य मराठा बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
