
महिला रुग्णांसह विद्यार्थी, नागरीकांचा फुटक्या रस्त्यावकरुन जिवघेणा प्रवास…
———————
प्रतिनिधी :
———————
वसमत शहरालगत असलेल्या गणेशपुर रोडवर शासकीय स्त्री रुग्णालय आहे. तसेच याच रोडवरुन ग्रामीण भागातील विद्यार्थी, नागरीकांची दळणवळण असते.वसमत येथे ये-करतात. मात्र सदरील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून जागोजागी मोठे खड्डे पडल्याने दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी शासकीय स्त्री रुग्णालयात महिलांना उपचारासाठी जाणेही कठीण होऊन बसले आहे. रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घ्यावे यासाठी थोरावा येथील शिक्षक प्रशांत लोखंडे यांनी तालुका प्रशासनास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवार ता.१८ प्रशांत लोखंडे यांनी “खड्ड्यात बसून पुस्तक वाचो आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या अधिकार्यांनी भेट देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली. तसेच उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी फोन करुन येत्या दोन ते तीन दिवसांत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर प्रशांत लोखंडे यांनी आंदोलन थांबवले .
आंदोलक शिक्षक प्रशांत लोखंडे यांनी यापुर्वीही सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला रेल्वे पुलावरील खड्डे बुजवून त्वरीत रस्ता दुरुस्त करावा यासाठी भीक मांगो आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता गणेशपुर रोडवर असलेल्या स्त्री रुग्णालयाकडे जाणारया रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे शासकीय सुसज्ज स्त्री रुग्णालय असल्याने उपचारांसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय असते. मात्र जागोजागी मोठे खड्डे व त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरीकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी धोकादायक कसरत महिला रुग्णांच्या नसीबी आली आहे. तसेच हिच अवस्था विद्यार्थ्यांची सुध्दा होत आहे. खड्ड्यातून जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रस्त्याची दुर्दशा पाहून महिला रुग्ण रुग्णालयाकडे पाठ फिरवत असल्याचे धक्कादायक चित्र असल्याचे प्रशांत लोखंडे यांनी सांगितले.
प्रशासनाने याबाबत संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करुन रस्ता दुरुस्त करावा अन्यथा रस्त्यावरील खड्ड्यांत बसून पुस्तक वाचो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला होता. त्यानुसार गुरुवारी शिक्षक प्रशांत लोखंडे यांनी वसमत- गणेशपुर रोडवरील खड्ड्यात बसून पुस्तक वाचो आंदोलन केले. दुपारनंतर नायब तहसीलदार श्री जाधव व इतर प्रशासनाचे अधिकारी यांनी प्रशांत लोखंडे यांची भेट घेऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली. तसेच उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी फोन करुन येत्या दोन ते तीन दिवसांत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर प्रशांत लोखंडे यांनी आंदोलन थांबवले.
