
लासीन मठाचे मठाधिपती गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज यांनी दिल्या नवनिर्वाचित पदाधिकारी , सदस्यांना शुभेच्छा व आशिर्वाद…
———————-
प्रतिनिधी :
———————
जंगम समाजाच्या जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रविवार ता.२८ सिद्धेश्वर मंदिर, लाशीन मठ येथे आयोजित विशेष बैठकीत जंगम समाजाची वसमत वहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये शहराध्यक्षपदी अशोक स्वामी बेंडके यांची तर सचिवपदी शिवचंद्र पत्रकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीत मावळते अध्यक्ष भारत स्वामी व त्यांच्या कार्यकारिणीने मागील पाच वर्षांत केलेल्या सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्याचा अहवाल सादर केला. त्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रम, व समाजातील समस्या सोडविण्यासाठी घेतलेली पुढाकार आणि सहकार्याचे विवरण देण्यात आले. त्यांनी समाजहितासाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगे होते.
नवीन नेतृत्व निवडून देताना समाजाच्या सर्व स्तरांतील प्रतिनिधींचा विचार करून समावेशात्मक कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी (2025 ते 2030) कार्यरत राहणार आहे. सर्वानूमते निवड केलेली नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष अशोक स्वामी बेंडके , उपाध्यक्ष विशाल उमेश स्वामी, सचिव शिवचंद्र मलिकार्जुन पत्रकर , कार्याध्यक्ष सोमनाथ सारंग बारूळकर सहकार्याध्यक्ष गजानन वीरभद्र स्वामी सातेफळकर, कोषाध्यक्ष सुरेश बाबुराव स्वामी, सहकोषाध्यक्ष राजेश्वर बसलिंग स्वामी, प्रसिद्धी प्रमुख संजीवकुमार बेंडके, बंडू बालाय्य कवठेकर तर सल्लागार मंडळात शिवशंकर स्वामी बाळापूरकर, रमेश स्वामी, वीरभद्र स्वामी बेंडके , विश्वनाथ बेंडके, महादेव स्वामी असेगावकर यांचा समावेश आहे.
येणारा काळातही नवी कार्यकारिणी विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक स्वामी वाखरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जंगम समाजाच्या एकंदर प्रगतीसाठी प्रत्येक पातळीवर काम करू. समाजाच्या हिताचे कार्यक्रम राबवणे,नव्या पिढीला सामावून घेऊन आणि संधी उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य ध्येय राहील.”
मठाधिपती गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज यांनी मार्गदर्शनपर आशिर्वाद देताना जंगम समाज, वसमत यांची नवीन कार्यकारिणी ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील. तसेच पारदर्शकता, कार्यकुशलता आणि समर्पणाच्या आधारावर हे नेतृत्व समाजाच्या गरजा ओळखून येत्या पाच वर्षांत ही समाजाच्या सर्वसामान्यांसाठी कार्य करत राहील, ही अपेक्षा व्यक्त केली. या निवडीचे समाजातील अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांनी स्वागत करीत एकमताने शुभेच्छा दिल्या.
