
शासनाचे लक्ष वेधन्याकरीता वसमत-परभणी रोडवरील हयातनगर फाटा येथे टेंभूर्णी सर्कल व परीसरातील शेतकऱ्यांचा दोन तास रास्तारोको….
———————
प्रतिनिधी :
——————–
वसमत तालुक्यात टेंभूर्णी व परीसरात अतिमुसळधार पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या खरीप हंगामासह बागायती पिके भुईसपाट झाली. एवढच काय ते पावसाचे पाणी शेतात घुसून मातीसह जमीन खरडून गेली आहे. उरल्यासुरल्या पिकावर विविध रोगांनी अटकाव केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहिर करुन सरसकट प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे या मागणीसाठी वसमत- परभणी रोडवरील हयातनगर फाटा येथे शनिवार ता.४ शेकडो शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करीत संताप व्यक्त केला.
शनिवारी सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलनास सुरुवात झाली. दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर वसमत-परभणी रोडवर ये-जा करणार्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. शेवटी प्रशासनाच्या प्रतिनिधींना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर आंदोलन थांबवले. निवेदनात शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफीची करावी, घरपडझडीची नुकसानभरपाई द्यावी, पाल्यांचे शैक्षणिक व परिक्षा शुल्क माफ करावी, शेतकऱ्यांना पाणी व वीज मोफत द्यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते तथा माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रल्हादराव राखोंडे, गट शिक्षण अधिकारी तान्हाजी भोसले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दासराव कातोरे, सुरेश संवडकर, आबासाहेब संवडकर, दौलतराव हुंबाड, विष्णू जाधव, दिलीपराव राखोंडे, संदिप माटेगावकर, युवा शेतकरी नेते अलोक इंगोले, प्रा नंदकुमार संवडकर, गजानन कदम, परसराम संवडकर, उद्धव संवडकर , शाम कदम यासह टेंभूर्णी व परीसाराती शेकडो शेतकरी उपस्थित होते. हट्टा व ग्रामीण पोलीस ठाणे येथील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
