
इच्छूकांमध्ये कुठे आनंद तर कुठे निराशा ; थंडीच्या दिवसात शहरातील राजकारण तापणार..
——————-
प्रतिनिधी :
——————
तब्बल दहा वर्षांच्या कालावधीनंतर होऊ घातलेल्या नगर परीषदेच्या निवडणुकीतील टप्पे सुरु झाले. नगराध्यक्षाच्या आरक्षण सोडतीनंतर बुधवार ( ता.८) शहरातील १५ प्रभागातील ३० सदस्यांची प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुकांच्या चेहर्यावर आनंद झळकत होता तर अनेक इच्छुकांच्या चेहर्यावर साफ निराशा दिसत होती.
शहरातील सुरमणी दत्ता चौगूले सांस्कृतिक सभागृहात बुधवारी दुपारी १ वाजता आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. या वेळी उपविभागीय अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी विकास माने , मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शिवानी भुसारे, देवांशी कमळू व युग झुंझूर्डे या बालकांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. सर्वप्रथम अनुसूचित जाती या प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ८ प्रभागांमध्ये ४ प्रभागासाठी सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. याऩतर सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढण्यात आली. एकुण १९ जागांपैकी ९ जागा सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. यावेळी शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. तसेच आरक्षण प्रक्रीयेसाठी शहर अभियंता नागनाथ देशमुख, कार्यालयीन अधिक्षक धोंडीबा दळवी, वरिष्ठ लिपिक दाजीबा भोसले, अरविंद शिकारी यासह कर्मचारी उपस्थित होते.
प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे…
प्रभाग क्रमांक १ मध्ये अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २ मध्ये अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ४ मध्ये अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ५ मध्ये अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६ मध्ये अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ७ मध्ये अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ८ मध्ये अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ मध्ये अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १० मध्ये अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ११ मध्ये अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १२ मध्ये अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १३ मध्ये अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १४ मध्ये अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण आणि प्रभाग क्रमांक १५ मध्ये अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे.
