शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली नोंदणी करावी….
——————
प्रतिनिधी :
—————–
वातावरणातील सततच्या बदलामुळे येणाऱ्या विविध आपत्ती, घटती उत्पादकता यांना तोंड देणे शक्य व्हावे याकरीता शेतकऱ्यांना सक्षम बनविणे, शेतक-यांचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत निर्मितीवर भर देणारी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या धरतीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व मापदंडानुमार, थेट लाभ हस्तांतरण तत्वावर सन २०२५-२६ पासून कृषि समृध्दी योजना शासनाने नव्याने सुरू केली आहे.
तसेच कृषि समृध्दी योजनेअंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२५-२६ करिता विविध घटकांचा भौतिक व आर्थिक घटकनिहाय लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनुदानित घटकासाठी केंद्र, राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या घटकातील देय अनुदान प्रमाण व मर्यादा लागू असतील. प्रचलित मापदंड राज्य शासनामार्फत निश्चित करण्यात येतील.
या योजनेत प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभ देण्यात येईल. योजनेअंतर्गत शेतकरी, महिला गट उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्यात येईल. अल्प, अत्यल्प भूधारक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी गावच्या कृषि सहाय्यक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्याकरिता लागवड साहित्य ४०, क्षेत्र विस्तार १९०, फळबाग पुनरुज्जीवन १२२, मधुमक्षिका पालन ५५, आळंबी उत्पादन २०, हरित गृह १०, शेडनेट ७१, प्लास्टिक मल्चींग ११३, फळकव्हर ६०, तण नियंत्रण आच्छादन ३०, सामूहिक शेततळे ३०, ट्रॅक्टर २७२, पॉवर टिलर २७०, इतर अवजारे २९६, पॅक हाऊस ७३५, कांदाचाळ ४५०, प्राथमिक प्रक्रिया ५, रेफर व्हॅन २, शीतगृह १, शीत खोली ५, एकात्मिक पॅक हाऊस २, असे एकूण २८३१ भौतिक लक्षांक व ४८.९८ कोटी आर्थिक लक्षांक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ साठी अतिरिक्त वाढीव लक्षांक प्राप्त झाला असून, जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली नोंदणी करावी.
महाडीबोटी पोर्टलच्या https://mahadbt.maharashtra.gov.in /Farmer/Login/Login या संकेतस्थळावर शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र इत्यादी माध्यमातून ‘महाडीबीटी’ च्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतात, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले आहे.
