बाराशीव येथील कपीश्वर शुगर्स अँन्ड केमिकल्स च्या गळीत हंगामास सुरुवात…
——————-
प्रतिनिधी :
——————-
बाराशीव हनुमान नगर येथील कपीश्वर शुगर्स अँन्ड केमिकल्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष अतिश भैय्या दांडेगावकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते शनिवार ता.१ करण्यात आला. या वेळी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बोलताना श्री दांडेगावकर यांनी विक्रमी ऊस उत्पादनासाठी आता एआय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

शनिवारी कपीश्वर शुगर्स अँन्ड केमिकल्सच्या ६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष अतिश भैय्या दांडेगावकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते गव्हाण पुजन व काटा पुजन करुन करण्यात आले. या वेळी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अतिश भैय्या दांडेगावकर यांनी भविष्यात ऊसतोडणी मजुरांची टंचाई होण्याची शक्यता असल्याने यापुढे ऊसतोडणी यांत्रिकी पध्दतीने करण्याची गरज असल्याचे सांगून या हंगामात उत्पादन क्षमता, वैज्ञानिक दृष्टिकोनातून ऊसशेती, व्यावस्थापकीय नियोजन यांचा समन्वय साधला जाईल असा विश्वास उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला. यावेळी मागील हंगामात सर्वाधिक ऊस पुरवठादार, ऊस वाहतूक ठेकेदार व ऊस तोडणी यंत्र मालकाचा कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील राजकीय मंडळी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक, ठेकेदार आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तसेच व्यावस्थापकीय टिम, कर्मचारी कामगारांची उपस्थिती होती.



