निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा…
——————–
प्रतिनिधी :
——————-
अखेर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा संपली. मंगळवारी तां.४ निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. यामध्ये राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे.
राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकांना प्रतीक्षा असलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यामध्ये फक्त नगरपरिषद आणि नगरपंचायती संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे ज्या २४६ नगरपरिषदामध्ये निवडणूक होणार आहे. त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे. तर दुसरीकडे ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे यात १५ नवीन नगरपंचायतीचा समावेश आहे. अजून १०५ नगरपंचायतीची मुदत संपलेली नाही.
निवडणूक कार्यक्रम…
निवडणुकीसाठी येत्या १० नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून १८ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याचे अंतिम दिवस असून २ डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.
राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीकांत आनंदोत्सव..
मोठया कालखंडानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रतिक्षेत असलेल्या राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीकांमध्ये आनंदाची लहर पहावयास मिळत आहे. अवघ्या पाच दिवसांनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून विविध पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुकांच्या तयारीला वेग आला आहे वेग. शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच मिनी विधानसभेचे बिगुल वाजले असून राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीला कसे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


