वसमत- आरळ महामार्गावरील बळेगाव पाटीजवळील घटना, गंभीर जखमी महिलेला नांदेड येथे हलवले, दोघींवर वसमत येथे उपचार सुरू..
——————-
प्रतिनिधी :
——————-
वसमत – परभणी महामार्गावर प्रवासी ऑटो पलटी होऊन झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार ता.१० रात्री साडे सातच्या सुमारास घडली आहे. गंभीर जखमी महिलेस तात्काळ नांदेड येथे हलविण्यात आले असून दोघींवर वसमत येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ७ च्या सुमारास एक प्रवाशी ऑटो प्रवाशी घेऊन वसमत येथून आरळच्या दिशेने निघाला होता. सदरील ऑटो बळेगाव ते तेलगाव पाठीच्या दरम्यान कातोरे यांच्या गुळ कारखान्याजवळ आला असता अचानक तो पलटी झाला. या अपघातात ऑटो मधील प्रवासी मारुती पांडुरंग राखुंडे राहणार आरळ यांचा जागीच मृत्यू झाला तर माधवी देविदास महाजन वय ३६, प्रिया भीमराव पाटील वय १३, चंद्रकला देविदास महाजन वय ५० हे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी जवळच असलेल्या आरळ येलल नागरीकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावली तसेच हट्टा पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, पोलिस जमादार ताम्रध्वज कासले, प्रितम चव्हाण व दोन होमगार्ड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी असलेल्या चंद्रकला महाजन यांना रुग्णवाहिकेतून नांदेड येथे हलविण्यात आले तर माधवी महाजन व प्रिया पाटील यांना वसमत येथील रुग्णालयात हलवले. मयत मारोती राखोंडे व जखमी दोन महिला व एक मुलगी आरळ येथील रहिवासी आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस करीत आह


