शरद पवारांची राष्ट्रवादी शुन्यावार बाद, राष्ट्रवादी काँग्रेस (दादा) 14, भाजपा 6, काँग्रेस 4, शिंदे शिवसेना 3, उबाठा शिवसेना 2, अपक्ष 1
——————-
प्रतिनिधी :
——————-
येथील नगर परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता मनमोहन बाहेती यांनी विक्रमी 20165 मताधिक्य घेवून विजय मिळवत नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. तर काँग्रेसच्या सीमा अ. हफिज ह्या 16714 मते घेवून दुसऱ्या नंबरवर राहिल्या, भाजपाच्या सुषमा बोडडेवार यांना 5403 मते मिळाली.
वसमत नगर परिषदेच्या निवडणूकीनंतर रविवार ता.21 येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी 10 वाजता एकुण 15 टेबलवर 6 फेऱ्यामध्ये मतमोजणीस सुरूवात झाली. पहिल्या फेरी पासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनिता बाहेती यांनी मतांची आघाडी घेतली. हि मतांची आघाडी शेवटच्या सहाव्या फेरीपर्यंत कायम होती. शेवटची फेरी संपली तेंव्हा सुनिताताई बाहेती यांना 20165 मते, काँग्रेसच्या सीमा अ, हफज यांना 16714 मते तर भारतीय जनता पक्षाच्या सुषमा बोड्डेवार यांना 5403 मते मिळाली. सुनिता बाहेती ह्या 3451 मतांच्या आघाडीने विजयी झाल्याचे निवडणूक निर्वाचन अधिकारी विकास माने यांनी जाहिर केले. त्याबरोबरच सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (दादा) 14, भारतीय जनता पक्ष 6, काँग्रेस 4, शिंदे शिवसेना 3, उबाठा शिवसेना 2 तर 1 अपक्ष असे एकून 30 उमेदवार सदस्यपदी निवडूण आले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र यावेळी खातेही खोलता आले नाही. यावेळी पोलिस निरिक्षक सुधिर वाघ यांनी मतमोजणी केंद्रवार चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
कन्हैय्या बाहेती यांचे सामाजिक काम फळाला आले, आई नगराध्यक्ष तर सौभाग्यवती नगरसेवक…..
मागील दशकात विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्व सामान्य नागरीकांची मने जिंकलेल्या कन्हैय्या बाहेती यांना आमदार राजू भैय्या नवघरे यांची मोलाची साथ मिळाली. परिणामी निवडणूकीत मतदारांनी पहिल्या क्रमांकाची पसंती देत त्यांची आई सुनिता बाहेती यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यांच्या सौभग्यवती उत्कृर्षों बाहेती ह्या नगरसेवकपदी निवडूण आल्या आहेत. कन्हैय्या बाहेती यांच्या सामाजिक कार्याची मतदारांनी दखल घेतल्याचे यावरून सिध्द होते. विजयानंतर त्यांच्या घरासमोर एकच विजयाचा जल्लोष पहायला मिळाला. यावेळी असंख्य नागरीकांनी कन्हैया बाहेती व आई सुनिता बाहेती यांचे अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली होती.

विजयी उमेदवार व त्याना मिळालेली मते खालिल प्रमाणे….👇




