वसमत तालुक्यातील थोरावा येथील अभ्गयास गटाचा कौतुकास्पद उपक्रम ; सर्व गावानेच घेतला अभ्यासाचा ध्यास…
——————-
प्रतिनिधी :
——————-
अभ्यासाने बाबासाहेबांचे आयुष्य बदलले आणि त्यांच्या आदर्शाने कित्येकांच्या आयुष्याचा कायापालट झाला. हिच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन वसमत तालुक्यातील थोरावा बुध्दविहाराच्या प्रांगणामत विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या सोबत वसमतचे उपजिल्हाधिकारी विकास माने व तत्कालीन उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांनी तब्बल दोन तास वाचन करुन वाचनसंस्कृतीला बळ दिले.
थोरावा येथे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी अभ्यास गट सुरु केला. गेल्या दहा महिन्यापासून सुरू असलेल्या याच अभ्यास गटांना भेट देण्यासाठी रविवारी वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने आणि नांदेडचे उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ थोरावा येथे आले होते. रविवार असूनही अभ्यास गटाला सुट्टी नसते. याचा प्रत्यक्ष अनुभव संबंधित अधिकाऱ्यांनी वाचन करून घेतला. जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत,आणि माजी विद्यार्थी संघ थोरावा यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या अभ्यास गटाच्या सायरन उपक्रमाने कात टाकली आहे. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास गावातील टिव्ही, मोबाईल, कर्णे बंद असतात. हे या अभ्यास गटाचे विशेष आहे.
मंदीर व्यवस्थापन,शाळा व्यवस्थापन समिती, माजी विध्यार्थी संघ आणि ग्रामपंचायत यांनी त्यासाठी बहुमोलाचे योगदान दिले आहे. कारण अभ्यासामुळे गावात सकारात्मक परीवर्तन झालेले दिसून येत आहे. स्वयंअध्ययन, अवांतर वाचन, श्रमप्रतिष्ठा, सहकार्य इत्यादी गुण लहान मोठ्यात रूजत आहेत. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. सचिन खल्लाळ म्हणाले की सलग चार तास एकाग्रतेने अभ्यास करु शकणारा कोणताही विध्यार्थी स्पर्धा परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकतो. तर विकास माने म्हणाले की असे उपक्रम इतर ठिकाणी सुरु झाले तर विभागातील गावांमध्ये चांगले शैक्षणिक वातावरण तयार होईल.
दररोज सकाळी पाच वाजता गावातील मंदिरातून पुजारी देवरे मामा सायरन वाजवितात आणि संपूर्ण गाव जागे होते. विद्यार्थी अभ्यास करतात तर जेष्ठ मंडळी व्यायमास जातात. तरूण भर्तीची तयारी करतात. तर काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. महिला भगिनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतात. तर सायंकाळी पाच वाजता हाच उपक्रम गटामध्ये समाविष्ट होतो. त्यासाठी गल्लीनिहाय दहा अभ्यास मंच आणि पस्तीस अभ्यास गट स्थापन केले आहेत. प्रत्येक मंचाची जबाबदारी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्यासाठी अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली पन्नास माजी विद्यार्थी पुढे सरसावले आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ देवरे, उपाध्यक्ष राहुल गवळी, सरपंच नवनाथ रौंदळे, उपसरपंच सोपान देवरे, तंटामुक्ती अध्यक्ष किशनराव देवरे, शिक्षण प्रेमी नागरिक दादाराव देवरे माजी विद्यार्थी उपाध्यक्ष अक्षय गुंजकर, गिरीष पारटकर, विठ्ठल देवरे, शंकर देवरे, शिवराज गाडगे, प्रशांत लोखंडे, राजू कजबे, अशोक देवणे, किरण कदम, अंगद देवरे, चंद्रकांत फेगडे, गजानन देवरे, नागनाथ फेगडे, बालाजी फेगडे, नागनाथ नरवाडे, शिवानंद गाडगे, व्यकंटी देवरे, संतोष देवरे, पुरभाजी कजबे, हौसाजी दवणे, महादू देवरे
तसेच या उपक्रमाला भेट देण्यासाठी आलेले सातेफळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोतीराम अंभोरे, विठ्ठल वाघ , वसमतचे तलाठी विलास जाधव,प्रेमानंद शिंदे,अशिष मगर, श्री महाजन यांच्यासह केंद्रप्रमुख सूर्यकांत देशमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला छपरे, रेखा माटे, पुष्पा जोशी, बालाजी चव्हाण, संगीता वर्मा , ज्योती चौंडे, उषा घोडके, जयमाला मुरकुटे, नागनाथ चलवदे, शिवदास पोटे हे अभ्यासाला बसले होते..


