पत्रकारांची मोफत रक्त तपासणी व आरोग्य सुविधा देणार – डॉ. कुंटे
——————–
प्रतिनिधी :
——————–
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्थेच्या वतीने मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित पत्रकारांचा भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे, ज्येष्ठ विधिज्ञ अँड.रणधीर तेलंगोटे , डॉ. कुंटे, विशाल अग्रवाल यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तर तथागत गोतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन वंदन करण्यात आले.

यानंतर बार्टी यांच्या वतीने उपस्थित पत्रकारांचा भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच समाजप्रबोधन, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि संविधानाची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला. संविधानातील मूल्ये पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात रुजविण्याचे कार्य पत्रकार करत असल्याने, उद्देशिका व पेन हे सन्मानचिन्ह म्हणून देण्यात आल्याचे आयोजक मिलिंद आळणे यांनी सांगितले. यावेळी डॉ कुंटे यांनी मार्गदर्शन करताना आधुनिक पत्रकारांच्या समाजाप्रती जबाबदारी वाढली असल्याचे सांगून यापुढे पत्रकारांची मोफत रक्ततपासणी व आरोग्य सुविधा देणार असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी विशाल अग्रवाल, ज्येष्ठ पत्रकार संजय बर्दापुरे, श्रीमती अनिता चव्हाण यांनी
बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि आधुनिक पत्रकारितेतही सत्य, निर्भीडता व सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. पत्रकारांनीही हा सन्मान प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.
या उपक्रमातून पत्रकारितेचे सामाजिक दायित्व अधोरेखित झाले असून, संविधानिक मूल्यांची जाणीव अधिक बळकट करण्याचा संदेश देण्यात आला. संजय बर्दापुरे,श्रीधर वाळवंटे , मोईन कादरी,नंदू परदेशी नागेश चव्हाण, अनिल पंडित, भगवान जाधव, रुपेश एंगडे,अशोक इंगोले,रवी कुंटे, बाळासाहेब कांबळे अनिता चव्हाण, विद्या इंगोले आदींची उपस्थिती होती.


