रत्नाकर अडसिरे, अँड दीपक कट्टेकर व मुजाहेद खान पठाण यांची स्विकृत सदस्यपदी निवड…
—————–
प्रतिनिधी :
—————–
वसमत नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सैय्यद इम्रान अली सय्यद नासेर अली यांची गुरुवारी ता.१५ बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्विकृत सदस्यपदी वसमतचे माजी नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, अँड दीपक कट्टेकर व मुजाहेद खान पठाण यांची निवड करण्यात आली. तसेच चार गटनेत्यांची निवड करण्यात आली.
नगर परिषदेच्या सभागृहात गुरुवारी नगराध्यक्षा सुनिताताई बाहेती यांच्या अध्यक्षतेखाली सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी सय्यद इम्रान अली नासेर अली व शिवदास नारायण बोड्डेवार असे दोन अर्ज प्राप्त झाले होते. मात्र ऐनवेळी शिवदास बोड्डेवार यांनी आपला उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतल्याने सय्यद इम्रान अली सय्यद नासेर अली यांची बिनविरोध निवड झाली आहे. याऩतर पक्षीय बलाबल नुसार रत्नाकर अडसिरे (वसमत शहर विकास आघाडी) , अंड दीपक कट्टेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) व मुजाहेद खान पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) यांची स्विकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून सचिन दगडू, शहर विकास आघाडीचे गटनेते म्हणून रुक्मिणी संजय भोसले , भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून शिवदास बोड्डेवार, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गट नेत्या म्हणून वर्षा युवराज आवटे यांची निवड करण्यात आली.
सदरील सर्वसाधारण सभेस मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर, शहर अभियंता नागनाथ देशमुख, कार्यालयीन अधिक्षक डी.जी. दळवी, रचना सहाय्यक महेश बिरादार, वरीष्ठ लिपिक दाजीबा भोसले,लिपिक अरविंद शिकारी,यासह कर्मचारी उपस्थित होते.


