नुतन हॉस्पिटलचे युनियन बँकेच्या मागे, बँक कॉलनी येथे सुसज्ज इमारतीमध्ये स्थलांतर….
——————–
प्रतिनिधी :
——————–
वसमत शहरासह पंचक्रोशीत मागील दोन दशकांपासून महिलांसाठी वरदान ठरलेले तसे विविध आजारांवर निदान व उपचार करणारे कर्हाळे मॅटर्निटी व नर्सिंग होम चे युनियन बँकेच्या मागे बँक काँलणी येथे सुसज्ज इमारतीमध्ये स्थालांतर झाले आहे. या नुतन हॉस्पिटलच्या सुसज्ज इमारतीमध्ये महिलांच्या विविध दूर्धर व गंभीर आजारावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार केले जाणार असल्याची माहिती हॉस्पिटलच्या संचालक डॉ उर्मिला कर्हाळे यांनी दिली आहे.

कर्हाळे मॅटर्निटी व नर्सिंग होम च्या नविन जागेत स्थालांतरानंतर दोन दिवस ओपनिंग सेरेमनी चा कार्यक्रम झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संचालक डॉ बालाजी कर्हाळे व डॉ उर्मिला कर्हाळे यांना शुभेच्छा देत भावी वाटचालीस सदिच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. नविन सुसज्ज हॉस्पिटलमध्ये महिलांच्या विविध गंभीर आजारावर उपचार केले जाणार असून यामध्ये नवीन तंत्रज्ञान मशीनचा वापर केला जाणार आहे. तसेच कॅन्सर सारख्या दुर्गा आजारावर देखील यशस्वी उपचार केले जाणार आहेत. उपलब्ध सुविधांमध्ये सुसज्ज प्रसूती ग्रह, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सरकारमान्य कुटुंब नियोजन केंद्र, फॅमिली प्लॅनिंग शस्त्रक्रिया, सरकारमान्य गर्भपात केंद्र, वारंवार होणारे गर्भपात निदान उपचार, मँनोपाँज क्लीनिक (रजोनिवृत्ती), गर्भाशयाचे आजाराचे निदान व उपचार, स्त्रियांच्या विविध कॅन्सरचे निदान व उपचार, वंध्यत्व निवारण व उपचार, पांढरा पदर ओटी पोटात दुखणे मासिक पाळीचे आजार, अंडाशयाची गाठ काढणे यासह प्रसुती सेवांमध्ये नॉर्मल डिलेव्हरी, सिझिरियन डिलेव्हरी, व्हॅक्युम डिलेव्हरी,एन एस टी मशीन, लॅप्रोस्कोपी व हिस्ट्रोस्कोपी मशीन, गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण व गर्भसंस्कार केंद्र आदी सुविधा देण्यात येणार आहेत. एकाच छताखाली सर्व आरोग्याच्या सुविधा मिळणार असल्याने व उपचारासाठी इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी धावपळ होणार नसल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.


