सचिवपदी वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज , गिरगाव येथील वीरमठ संस्थांना येथे नुतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम संपन्न…
———————–
प्रतिनिधी :
———————–
अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या हिंगोली, नांदेड विभागीय नुतन पदाधिकारी निवडीची बैठक रविवारी ता.१४ संपन्न झाली. या वेळी अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या विभागीय अध्यक्षपदी गिरगाव येथील वीरमठ संस्थांनचे मठाधिपती श्री ष.ब्र.१०८ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सचिवपदी वसमत येथील थोरला मठ संस्थानचे मठाधिपती वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांची निवड करण्यात आली आहे.
रविवारी गिरगाव येथील वीरमठ संस्थांना येथे हिंगोली व नांदेड येथील शिवाचार्यांची अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या विभागीय नुतन पदाधिकारी निवडीबाबत बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री ष.ब्र.१०८ श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागनसूर (रेवूर) यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वानूमते गिरगाव येथील वीरमठ संस्थांनचे मठाधिपती श्री ष.ब्र.१०८ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांची शिवाचार्य संस्थेच्या विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच श्री ष.ब्र.१०८ डॉ सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज शिवलिंग बादशहा मठ बेटमोगरा यांची उपाध्यक्षपदी, वसमत येथील थोरला मठ संस्थानचे मठाधिपती श्री ष.ब्र.१०८ वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांची सचिवपदी, श्री ष.ब्र.१०८ शिवानंद शिवाचार्य महाराज मठ संस्थान तमलूर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याबरोबरच सदस्य म्हणून श्री ष.ब्र.१०८ शिवचैतन्य शिवाचार्य महाराज महादेव मठ संस्थान हदगाव, श्री ष.ब्र.१०८ रुद्रमुनी शिवाचार्य महाराज अपरंपार मठ मुदखेड, श्री ष.ब्र.१०८ महादेव शिवाचार्य महाराज तोटलिंग मठ कळमनुरी, श्री ष.ब्र.१०८ शंकरलिंग शिवाचार्य महाराज मठ हानेगाव, श्री ष.ब्र.१०८ करबसव शिवाचार्य महाराज लासिनमठ वसमत, श्री ष.ब्र. प्रभुलिंग शिवाचार्य महाराज सारंगस्वामी मठ शिरडशहापूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी मनोगत व्यक्त करुन नुतन शिवाचार्य पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी शिवाचार्य संस्थेची आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
