लोकनृत्य, हिंदी मराठी गाण्यावर नृत्याचे कौतुकास्पद सादरीकरण…
कोमल पत्रे/निलंगे
नांदेड :
नांदेड येथील कौठा परिसरातील संस्कार व्हॅली प्ले स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी ता. २१ मोठया उत्साहात संपन्न झाले चिमुकल्या बाल कलाकारांनी विविध गाण्यावर समुह नृत सादर करीत उपस्थित पालकांचे लक्ष वेधले.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संस्कार व्हॅली प्ले- स्कुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव मोदी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून संतुकराव हंबर्डे, मुख्याध्यापिका संगीता मोदी यांची उपस्थिती होती.
यावेळी चिमुकल्या बाल कलाकारांनी विविध हिंदी व मराठी गाण्यावर एकर नृत्य व समुह नृत्य सादर केले. तसेच ‘ विविधतेत एकता’ ह्या सामाजिक संदेश देणाऱ्या नाटीकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. बाल कलाकारांनी अदाकारी बघून उपस्थित पालक, नागरीक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शिक्षिका कोमल पत्रे/निलंगे यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सीमा जाधव, कांचन कौर पुजा मोरे यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाका घेतला. कार्यक्रमाला कौठा परीसरातील पालक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


