
राज्यातील वैद्यकीय जागा सुमारे २६०००, पात्र विद्यार्थी १ लाख २५ हजार ७२७….
—————–
प्रतिनिधी :
—————–
वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाती अत्यंत महत्वाच्या समजली जाणार्या नीट यूजी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यंदाही राज्यात हजारो जागांसाठी लाखो विद्याथ्यर्थात जोरदार स्पर्धा होणार आहे. राज्यात एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि यासारख्या अभ्यासक्रमांसाठी अंदाजे २६ हजारांहन अधिक जागा उपलब्ध आहेत. मात्र यंदा १ लाख २५ हजारांहून अधिक विद्यार्थी नीटला पात्र ठरले आहेत. त्यामुळे एकाच जागेसाठी अनेक पात्र उमेदवार असणार असून चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गुणवत्तेची चुरस पहायला मिळणार आहे.
यंदा महाराष्ट्रातून एकूण २ लाख ४८ हजार २०१ विद्याथ्यांनी मोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ४२ हजार ८५८ विद्याथ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पात्र-तेचा टका जवळपास ५१ टक्के इतका आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या थोडी कमी झाली असली, तरी देशपातळीवर टॉप १०० रैंकर्समध्ये राज्यातील १० विद्याध्याँचा समावेश झालेला आहे. एमबीबीएससाठी विद्यार्थ्यांचा व पालकांचा कल शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडेच असती. यामुळे मुंबईतील केईएम, सापन, नायर, ग्रेट, पुण्यातील बी. जे. मेडिकल, तसेच औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, मिरज येथील शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मोठी चढाओढ होणार आहे. या कॉलेजांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, उत्तम सुविधांमुळे विद्यार्थ्यांची पसंती कायम असते.
शासकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास अनेक विद्यार्थी आयुर्वेद, होमिओपॅथिक आणि युनानी अभ्यारक्रर्माकडे वळतील, त्यामुळे तिथेही कटऑफ वाढण्याची शक्यता आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्याथ्र्यांना मागील वर्षपिक्षा खूप कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे यंदा प्रवेशाचा कटऑफ खाली येणार आहे. त्यामुळे विद्याध्यांनी मागील वर्षांच्या माकपिक्षा आपल्या देशपातळीवरील प्रवेशासाठी ऑल इंडिया रैंक आणि महाराष्ट्रातील प्रवेशासाठी राज्य गुणवत्ता यादी विचारात घ्यावा लागणार आहे. राज्याचा विचार केला तर शासकीय मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस प्रवेशाचा कट ऑफ ४९५ ते ५०५ गुणांपर्यंत असू शकतो तर खासगी मेडिकल कॉलेजमधील प्रवेशाचा कट-ऑफ ४५० ते ४९० पर्यंत जाऊ शकतो. तसेच मागील वर्षी नॅशनल कट ऑफ ६३७ पर्यंत होता. यंदा तो ५२० मार्कापर्यंत पर्यंत कमी होऊ शकतो अशी माहिती अशी माहिती शिक्षण तज्ञांकडून मिळते.
अव्वल गुणवत्तेत तिवृ स्पर्धा…
यंदाचा निकाल पाहता ६०० पेक्षा जास्त गुण मिळवणे कठिण गेले आहे. यंदा अव्वल १०० विद्यार्थ्यांमागे ७३ विद्यार्थी आहेत. जे ६५१ – ६८६ गुणांच्या श्रेणीत आहेत. त्यामुळे गुणवत्तेत चुरस पहायला मिळेल. १४४ ते २०० गुणांच्या रेंज मध्ये सर्वाधिक ३ लाख विद्यार्थी आहेत. तर ६०१ ते ६५० गुण मिळवणारे केवळ १ हजार २५९ विद्यार्थी आहेत.
राज्यातील महाविद्यालयाचा अंदाजे कट आँफ…..
शासकीय महाविद्यालय – ४९५ ते ५०५
खाजगी महाविद्यालय – ४५० ते ४९०
आँल इंडिया कोटा – ५२० (अंदाजे)
मागील वर्षिचा आँल इंडिया कोटा – ६३७
अभ्यासक्रम, प्रवेश आणि जागा…
एमबीबीएस ५३ संस्थांमधून ७३२४ जागा
बीडीएस २९ संस्थांमधून २६७५ जागा
बीएमएस १०५ संस्थांमधून ७८५७ जागा
बीएचएमएस ५७ संस्थांमधून ४५९४ जागा आहेत.
