रत्नागिरी येथे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परीक्षेची राज्यस्तरीय शिक्षण परीषद संपन्न…
——————–
नांदेड : नामदेव चव्हाण
——————-
बरबडा जिल्हा नांदेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माधवराव रेडेवाड यांना रत्नागिरी येथे आयोजित कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परीषदेच्या वतीने राज्यस्तरीय फुले मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परीषदेच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणार्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. बरबडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माधवराव रेडेवाड यांचे शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान आहे. तसेच सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परीषदेने त्यांची राज्यस्तरीय फुले मित्र पुरस्कारासाठी निवड केली होती. त्यानुसार रत्नागिरी येथे आयोजित कार्यक्रमात माधवराव रेडेवाड यांचा पूर्व ब्रिगेडीयर तथा माजी खासदार सुधीर सावंत शिक्षक परीषदेचे संस्थापक व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते राज्यस्तरीय फुले मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे याच शिक्षक परीषदेकडून श्री रेडेवाड यांनानांदेड येथे आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दोहेरी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल माधवराव रेडेवाड यांचे सकल आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने दत्ताभाऊ सुरवसे, बाळासाहेब बळवंतराव व मराठवाड्याचे नेते नागनाथ घिसेवाड यांच्या हस्ते गौरव पत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर बरबडा शाळेच्या व गावकर्यांच्या वतीने अभिनंदन करीत सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल मोटार वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर, ज्ञानेश्वर मरकटे, मारोती शिंदे, अजय चवरे, चंद्रकांत लोखंडे, नामदेव चव्हाण यासह शिक्षक, मित्रमंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


