स्थानिक गुना शाखा व शहर पोलिसांचा छापा , १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
——————–
प्रतिनिधी :
——————–
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी स्थानिक गुना शाखा व स्थानिक पोलीस पथकास जिल्ह्यातील अवैधरित्या चालणाऱ्या व्यवसायावर कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुना शाखा व शहर पोलीस पथकांने बुधवारी ता. ११ सायंकाळी ६ च्या सुमारास कारखाना रोडवरील फिजा कॉलनीत चार चाकी वाहनात अवैधरित्या घरगुती गॅसचा भरणा सुरू असलेल्या केंद्रावर कार्यवाही करीत १७ हजार रुपयांचा मुद्देमाल मत्ता केला आहे.
वसमत शहरात घरगुती गॅसचा काळाबाजार होऊन चार चाकी वाहनात अवैधरित्या गॅस भरणा केंद्र सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखा व शहर पोलीस पथकांची पेट्रोलिंग सुरू असताना त्यांनी कारखाना रोडवरील फिजा कॉलनी येथे आरोपींच्या राहत्या घरात तपासणी केली असता त्यामध्ये भारत कंपनीचे तीन रिकामे गॅस सिलेंडर, इंडेन कंपनीचा एक रिकामा सिलेंडर, भारत कंपनीचा एक भरलेला गॅस सिलेंडर, एक डीसी कंपनीची मोटर व त्यास जोडलेले गॅस पाईप असा एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून चार चाकी वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणे केंद्र चालवणारा शेख माजीत शेख खुर्शीद वय ३५ व्यवसाय ऑटो चालक याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुना शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांभ घेवारे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, शिवाजी जालमीरे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, साईनाथ कंठे, ज्ञानेश्वर गोरे, संभाजी लकुळे, नितीन रामदीनवार, श्री मुकाडे यांनी केले आहे.
याच भागात दुसरी कारवाई…
अवैध यास भरणा केंद्रावर याच भागामध्ये यापूर्वीही पोलिसांनी कार्यवाही केली होती. परंतु घरगुती गॅसचा अवैध काळाबाजार मात्र थांबला नाही तो चालूच राहिला. सर्वसाधारण ग्राहकांना नंबर लावल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळत नाही मात्र या अवैध केंद्र चालकांना अवैध व्यवसायासाठी एजन्सी धारकाकडून घरगुती गॅस सिलेंडर कसा मिळतो याची चौकशी व्हावी तसेच संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे.


