
हिंगोली जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा..
——
प्रतिनिधी :
—
औंढा नागनाथ येथील नागनाथ कला वाणिज्य व विज्ञान माहाविद्यालयातील प्रा. डॉ. वसंत गाडे यांची केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या संयुक्त हिंदी सल्लागार समितीवर निवड झाली आहे. केंद्राच्या वित्त मंत्रालयाने हि निवड केली आहे. महाराष्ट्रातून त्यांची एकमेव निवड झाल्याने हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेल्या आहे.
प्रा. गाडे हे मागील २७ वर्षापासून नागनाथ महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत आहेत. स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे ते सदस्य होते. तसेच विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे.
भारत सरकारच्या वित्त मंत्रालय यांच्या संयुक्त हिंदी सल्लागार समितीवर सदस्य म्हणून दुसऱ्यांचा निवड झाली आहे. सदर समितीचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन काम पाहत आहेत. केंद्रीय वित्त राज्यमंत्री उपाध्यक्ष असू याशिवाय तीन लोकसभा व तीन राज्यसभेचे खासदार या समितीमध्ये आहेत. तर हिंदी भाषा प्रचार व प्रसार याच्याशी निगडीत संस्थांचे दोन प्रतिनिधी या समितीमध्ये असतात.
या समितीमध्ये सदस्य म्हणून उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, मेघालय, तामीळनाडू राज्यातील प्रत्येकी एक सदस्य असून महाराष्ट्रातून प्रा. वसंत गाडे यांची एकमेव निवड झाली आहे. या शिवाय सरकारी सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्रालयातील विविध विभागाचे सचिव, अप्पर सचिव, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, जीवन विमा कंपनीचे अध्यक्ष, भारतीय स्टेट बँक, सेबीचे अध्यक्ष असे ३२ सदस्य या समितीमध्ये आहेत.
राजभाषा संबंधित संवैधानिक तरतुदी, राजभाषा अधिनियम व नियम, केंद्रीय हिंदी समितीचे निर्णय, राजभाषा विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या निर्देशाची अंमलबजावणी व मंत्रालय, त्यांच्या विभागातील कामकाजात हिंदी भाषेचा वापर वाढविण्यासाठी सल्ला देण्याचे काम या समितीमार्फत केले जाते. प्रा. वसंत गाडे यांच्या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. विजयकुमार कानवटे, प्रा, नवीन वसेकर, प्रा. स्वप्नील आकाशे, प्रा. पाईकराव यांनी अभिनंदन केले आहे.
