वसमत येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने माऊली महाराज जमदाडे यांचे कीर्तन संपन्न….
—————–
प्रतिनिधी :
——————
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाच्या संरक्षणाची ढाल असून महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कदाचित जन्मला आले नसते तर आजचा जो वारकरी संप्रदाय दिसतो तो तुम्हाला दिसला नसता. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि वारकऱ्यांचा टाळ हेच या महाराष्ट्राचे भविष्य असल्याचा गुरुमंत्र जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला होता. असे मत आळंदी येथील हरिभक्त परायण माऊली महाराज जमदाडे यांनी गुरुवारी ता.१९ व्यक्त केले ते वसमत येथील सार्वजनिक शिवजन्म सोहळा समितीच्या वतीने आयोजित शिवकिर्तन सोहळ्यात बोलत होते.

वसमत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मागील 18 वर्षापासून सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. यावर्षी सूरमणी दत्ता चौगुले संस्कृतिक सभागृहामध्ये समितीच्या वतीने शिव प्रबोधन कीर्तन सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकरी संप्रदायाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज सभागृहाच्या बाहेर वसमतच्या नगराध्यक्ष सुनीताताई बाहेती आणि माऊली महाराज जमदाडे व शिवप्रेमीच्या उपस्थितीमध्ये फडकवण्यात आला.
शिव प्रबोधन करताना माऊली महाराज जमदाडे म्हणाले की, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच होते कदाचित हे दोन राजे प्रतिदलावरती जन्माला आले नसते तर आज जो वारकरी संप्रदाय वाढला आहे तो कदापि वाढला नसता कारण छत्रपती शिवाजी महाराजांनीच वारकरी संप्रदायाच्या भगव्या ध्वजाचे संरक्षण केले तसेच महाराष्ट्रातील साधुसंतांचे संरक्षण केले. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यमाकाम हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग छत्रपती शिवाजी महाराज जगले आणि त्यांनी वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी आजी- माजी नगर सेवक , वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक शिवजन्मोसो सोहळा समितीचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.


