
अरर्धवट मोजणी अहवाल दिल्याची मुख्याधिकर्यांची तक्रार तर मागणीनुसार मोजणी अहवाल दिल्याची भूमिअभिलेख कार्यालयाची माहिती….
लक्षवेधीत गरम झालेला मुद्दा थंड कसा झाला, नागरिकांचे लागले लक्ष…
वसमत /
आमदार राजु नवघरे यांनी दोन वेळेस लक्षवेधी मांडून वसमत शहरातील वसमत- परभणी महामार्गालगत हार्ट आँफ सिटी असलेल्या भुखंडावरील भुमाफियांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची जोरदार मागणी केली होती. त्यानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चोविस तासाच्या आत सदरील प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर भूमिअभिलेख कार्यालयाने सदरील भुखंडाचे मोजमाप करुन आपली जबाबदारी पार पाडली परंतू मुख्याधिकारी यांनी सदरील मोजमाप अहवाल अर्धवट असल्याचे सांगून तो नाकारला. यावर भुमि अभिलेख कार्यालय मात्र आम्ही मागणीनुसार मोजणी करुन मोजमाप अहवाल सादर केल्याचे म्हणत आहे. दोन्ही कार्यालयाच्या परस्पर विरोधी विधानामुळे आमदार राजु नवघरे यांनी गरम केलेला मुद्दा वाढत्या गरमीत थंड बस्त्यात अडकला असल्याचे चित्र आहे.
शहरातील वसमत परभणी महामार्गावरील नगर परिषदेची मोक्याची जागा असलेली सर्व्हे नंबर १५० भुखंड अनाधिकृत इतरांच्या नावे कसा झाला त्याचा शोध तब्बल ६० वर्षांनंतर सुरु झाला आहे. आमदार राजू नवघरे यांनी सदरील प्रकरणाची सभागृहात दोन वेळा लक्षवेधी मांडली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी १५ दिवसांत अतिक्रमण न हटवल्यास सबंधितावर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून चौकशी केली जाईल तसेच या प्रकरणात मदत करणार्यां दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. याला महिना उलटून गेला दोषींवर कारवाई तर दूरच परंतू साधा मोजमाप अहवाल नगर परिषद प्रशासनाला मिळाला नाही. भूमिअभिलेख कार्यालयाने सदरील वादग्रस्त भुखंडाचे मोजमाप केल्यानंतर अहवाल मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांना पाठवला परंतू सदरील मोजमाप अहवाल हा अर्धवट असल्याचे सांगून त्यांनी तो नाकारला. यावर नगर परिषदेच्या वतीने भूमिअभिलेख कार्यालयास तीन ते चार नोटीस बजावून भुखंडाचा मागणीनुसार पुर्ण अहवाल देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिस संरक्षणात जमिनीचे मोजमाप झाल्यानंतर वादग्रस्त जमीनीवरील अतिक्रमण हटवले जाईल असे सर्वसाधारण नागरीकांना वाटले होते. परंतू महिना दिड महिना उलटून गेला तरी अद्याप साधा मोजमाप अहवालच नगर परीषद प्रशासधाला प्राप्त झाला नसल्याने सदरील प्रकार हा ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ असा होता की काय असा प्रश्न पडला आहे. आमदार राजू नवघरे यांनी लक्षवेधी मांडून गरम केलेला मुद्दा, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चौकशी व कारवाईचे दिलेले आश्वासन नगर परीषद कार्यालय व भूमिअभिलेख कार्यालयाच्या परस्परविरोधी तक्रारींमुळे थंड बस्त्यात बसते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोट…
सदरील भुखंडाचे मोजमाप झाल्यानंतर आम्ही आम्ही नगर परीषद कार्यालयास पुढील कारवाईसाठी मोजमाप अहवाल मिळावा यासाठी भूमिअभिलेख कार्यालयास पत्र दिले होते. त्यानंतर त्यांनी सदरील मोजमाप अहवाल अर्धवट दिला. यावर आम्ही त्यांना नोटीसा देऊन पुर्ण अहवाल देण्याची मागणी केली आहे.
निलेश सुंकेवार, मुख्याधिकारी, नगर परिषद, वसमत.
कोट….
नगर परीषदेच्या वतीने सर्व्हे नंबर १५० ची पोट हिस्सा मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार आम्ही मोजणी करुन आम्ही आँनलाईन व प्रत्यक्ष मोजणी अहवाल नगर परीषद कार्यालयास दिला आहे. नगर परीषदेस पुर्ण सर्व्हे नंबरची मोजणी करायची असेल तर न्यायालयामार्फत करावे लागेल.
श्री सोळंके, सिरस्तेदार, भूमिअभिलेख कार्यालय, वसमत.
