माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयास अहुजा कंपनीची साऊंड सिस्टिम भेट..
——————
प्रतिनिधी :
——————
येथील जवाहर नवोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमास वेगळी शोभा आणली.
आधुनिक शिक्षणाबरोबरच शिस्त व सांस्काराची शिदोरी असलेल्या वसमतीतील जवाहर नवोदय विद्यालयात सात डिसेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, वसमत येथील प्रसिद्ध बाळ रोग तज्ञ तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ बालासाहेब सेलूकर, पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले, तसेच माजी विद्यार्थी सहभागी संस्थेचे अध्यक्ष अॅड. जगन जामगे, सचिव डॉ. बालासाहेब शेलूकर, उपाध्यक्ष सुवर्णाताई नादरे, संचालक डॉ. शाम दवणे, डॉ. माधव फोले, डॉ. अनुसया बिरादार (कोनाळे), श्रीम. वायकोस (संघाई), गजानन बोबडे, बालाजी सर,साहेबराव अन्नपूर्वे, अविनाश सामाले, प्रभाकर घाटुळ आदी मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच विद्यालयाचे प्राचार्य श्री गवई , उपप्राचार्य किशन गायकवाड यासह शिक्षकांची उपस्थिती होती. प्रमुख मान्यवर पाहुणे व विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांना विद्यालयाच्या गेटपासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत लेझीम पथक एनसीसी पथक व स्काऊट गाईड पथकाने आदराने सलामी सह नेण्यात आले. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करीत मेळाव्याला वेगळी शोभा आणली.
मेळाव्यात मेळाव्यात जी.बी खिल्लारे यांच्या नवोदय कवितासंग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य आणि संस्काराचा संगम असलेल्या या प्रकाशन सोहळ्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यालयाच्या सांस्कृतिक उपक्रम नवीन बळ मिळावे यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत विद्यालयास आहूजा कंपनीची साऊंड सिस्टिम भेट दिली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचा माहोल पाहायला मिळाला. मेळावा यशस्वी करण्यासाठी दिल्याचे सर्व शिक्षक व सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. भावी काळात अशा उपक्रमामुळे शाळा व माजी विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक द्रड करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.


