नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले कौतुक…
——————-
हिंगोली : साईनाथ पतंगे
——————-
वसमत येथील रहिवाशी असलेले पोलीस अंमलदार महारुद्र कबाडे यांचा मुलगा व नांदेड शहरातील ज्ञान भारती विद्या मंदिर विद्यालयाचा सहावीतील विद्यार्थी धनुष महारुद्र कबाडे याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेची तिसरी फेरी पार करून अंतिम तोंडी परीक्षेमध्ये मुंबई येथे कांस्यपदक प्राप्त केले.
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ही विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण क्षमता व तार्किक विचारांची चाचणी घेणारी प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. धनुषणे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक मिळविले आहे.

तिसऱ्या फेरी मध्ये सादर करावयाच्या प्रकल्पासाठी धनुषने ‘पृथ्वी प्रणालीची अंतरक्रिया, मानवी कृती आणि पाण्याचा वापर’ हा विषय निवडला होता. या प्रकल्पासाठी त्याने विविध ठिकाणी भेटी घेऊन माहिती संकलित केली व त्यावर अभ्यास करून पाण्याचा वापराबाबत सविस्तर विश्लेषण केले. अचूक व सादरीकरण केल्याबाबत डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक संस्थेच्या वतीने धनुष कबाडे याला कास्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याच्या यशा बद्दल नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी धनुष कबाडे व पालक महारुद्र कबाडे यांचा सन्मान करून कौतुक केले. प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी धनुष यास ज्ञान भारती विद्या मंदिर विद्यालयाचे अध्यक्ष अध्यक्ष श्री वाकोडे पाटील, आदित्य तुंगेनवर, श्रीमती जोशी, वर्गशिक्षक श्री नगरे, श्री सातारे व आई-वडील सौ. स्नेहलता महारुद्र कबाडे, काका श्री सुनील कबाडे, तसेच श्री बालाजी गोदरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


