एक वर्षाचा अभ्यासक्रम, तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारच्या संधी उपलब्ध होणार…
——————-
प्रतिनिधी :
——————-
वसमत येथील स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये इतर अभ्यासक्रमाबरोबरच सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिकल अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती प्राचार्य एस.एल कोंडावार यांनी दिली. या एक वर्षाच्या अभ्यासक्रमामुळे तरुणांना भविष्यात रोजगार व स्वयंरोजगारच्या संधी मिळणार आहेत.
कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या पुढाकारातून ‘न्यू एज कोर्स’ चालू करण्यासाठी
शासनाने 2025 पासून ‘सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिकल’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम वसमत येथील ITI मध्ये चालू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. तसेच प्रशिक्षण महानिदेशालय नवी दिल्ली यांचे कडून ग्रीन चॅनेल मार्फत Affiliation सुद्धा मिळवलेले आहे. सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. वसमत येथील ITI मध्ये सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली असून प्रवेश इच्छुक जास्तीत जास्त उमेदवारांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरून कोणत्याही नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन भरलेला प्रवेश फॉर्म निश्चित करून घ्यावा तसेच चौथ्या राऊंडच्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घ्यावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस एल कोंडावार यांनी केलेले आहे.


