
नागरीकांचे जिवनमान उंचावण्यासाठी वसमत नगर परीषदेचा उपक्रम…
*********
वसमत
*********
वसमत शहरातील नागरीकांचे जिवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी वसमत नगर परीषदेने अभिनव ‘ फाईव्ह स्टार वसमतकर ‘ उपक्रम राबविणे सुरू केले आहे. या उपक्रमाचे निकष पुर्ण करणार्या नागरीकांचा नगर परीषदेच्या वतीने सन्मान केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकार घेत आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत नगर परीषद कार्यक्षेत्रातील सर्व घरे, व्यावसायिक, शैक्षणिक आस्थापना तसेच शासकीय कार्यालय यांनी पाच निकषांची पुर्तता करुन फाईव्ह स्टार वसमतकर चा बहुमान मिळवायचा आहे.
पाच निकष कोणते..
या पाच निकषांमध्ये नागरीकांना जलपुनर्भरण, घराभोवती किमान पाच झाडे लावणे, घरामध्ये कचर्याचे विलगीकरण करुन सुका कचरा.,ओला कचरा वर्गीकरण करणे, रुफटाँप सोलर पँनल (सुर्य घर योजना) , नगर पंचायत मार्फत आकारण्यात येणाऱ्या करांचे विहित वेळेत भरणा करणे या निकषांचा समावेश आहे.
वरील निकषानूसार शहरातील सर्व घर व आस्थापनाचे नगर परीषद मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.सर्वेक्षणाचे फाँर्म संबंधित वसुली कर्मचारी यांच्याकडे उपलब्ध आहे. जे नागरीक सदरील अभिनव उपक्रमात सहभागी होऊन पाच निकषाची पुर्तता करतील त्यांचा नगर परीषदेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी ‘फाईव्ह स्टार वसमतकर ‘ उपक्रमात सहभागी होऊन आपल्या शहराला स्वच्छ, पर्यावरण पुरक व आदर्श शहर बणविण्यात विटा उचलावा असे आवाहन वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी केले आहे.
