राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसमत शहराध्यक्षपदी निवडीबद्दल आनंदोत्सव…
——————
साईनाथ पतंगे
——————
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसमत शहराध्यक्षपदी आनंद उर्फ रवी बडवणे यांची निवड झाल्याबद्दल वसमत येथे त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व पेढा भरून सत्कार करण्यात आला तसेच आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आनंद उर्फ रवी बडवणे यांची नुकतीच मुंबई येथे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन वसमतच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांच्यासह जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आनंद उर्फ रवी बडवणे हे मागील तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा स्वभाव व पक्षकार्याची हातोटी जनमानसात परिचित आहे. त्यांचे संवाद कौशल्य हे जनसंपर्क वाढवणारे आहे. यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेना पक्षात सक्रिय राहून काम केले आहे. मागे होऊ घातलेल्या निवड विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदार राजीव भैया नवघरे त्यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
विधानसभा निवडणुकीत केलेले कार्य आणि वसमत शहरात पक्ष संघटन मजबूत केलेल्या कामाची दखल पक्षाने घेतली. नुकतेच त्यांची मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता ताई पवार यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांची वसमत शहराध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीनंतर वसमत येथे त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने जंगी स्वागत करून सत्कार केला आहे. यावेळी नगरसेवक इंजि. रत्नाकर आडसिरे , अभय आंबेकर, सुधीर नवाब, श्री विष्णुपुरीकर, वसमत नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी श्याम भाऊ माळवटकर, व्यंकटेश दैठणकर, विलास जवळेकर, सतीश आसेगावकर, विलास कुलकर्णी, सतीश आंबेकर, श्री कबाडे यांची उपस्थिती होती.


