
आनंद खरे यांची शहर पोलिसांकडे कडक कारवाई करण्याची मागणी…
वसमत :
घरगुती गॅसचा वाहनांमध्ये इंधन म्हणून अवैधरित्या वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे मानवी जिवास धोका निर्माण झाला असून संबंधितांवर कडक कार्यवाही करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधिर वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वसमत शहरातील एका प्रशासकीय कार्यालया जवळ खुले आम तीन चाकी व चार चाकी वाहणात मोठया प्रमाणात घरगुती गॅस इंधन म्हणून अवैधरित्या भरला जात आहे, गॅस भरण्यासाठी वाहणांच्या लांब रांगा लागत असून हे अत्यंत धोकादायक आहे. तसेच काही अंतरावर मोठया प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा केल्या जात आहे, घरगुती गॅसचे ऑनलाईन नंबर लावून ग्राहकांना वेळेत गॅस मिळत नाही परंतु या लोकांना इतक्या मोठया प्रमाणात गॅस सिलेंडर कुठून व कोण उपलब्ध करून देतात हे मात्र कळायला मार्ग नाही. काही वर्षपूर्वी अश्याच प्रकारे घरगुती गॅस वाहनात भारताना स्फ़ोट झाला असल्याचे निवेदनात सांगून त्यावेळी मोठा अनर्थ टळला होता. सदरील गॅस हा खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठया प्रमाणात भरल्या जात असल्यामुळे भविष्यात मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील प्रकरणी योग्य ती कार्यवाही करून घरगुती गॅसचा अवैधरीत्या साठा करून खासगी वाहनात भरणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्याकडे केली आहे.
