
यमुना प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगर परीषदेचे माजी उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार यांचा उपक्रम…
********
वसमत
********
गो- माता चंद्राच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व गो-पुजनाच्या सोहळ्याचे आयोजन वसमत येथील सद्गुरू रंगा महाराज मठ येथे शनिवारी ता.२४ सायंकाळी ५.३० वाजता केले आहे. तसेच यावेळी सामूहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी वसमत शहरातील नागरीकांसह परीसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगर परीषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा यमुना प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिताराम म्यानेवार यांनी केले आहे.
वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा नगर परीषदेचे माजी उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार यांनी या सोहळयाचे आयोजन केले आहे. सोहळयात गो- पूजनासह सामुहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे डॉ राधिकाताई कमाविसदार, संगरा अशोक चुंबळकर, डॉ प्रिती वैद्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोहळयासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजीमंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजु नवघरे, आमदार संतोष बांगर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार तथा हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यासह सर्व पक्षीय नेते पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सदरील गो-पुजन व विवाह सोहळ्यासाठी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तथा यमुना प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिताराम म्यानेवार, माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुनिल काळे, विश्व हिंदू परिषदेचे वसमत प्रखंड गणेश काळे यांनी केले आहे.
