
बुधवारी मुंबई येथे गोमाता चंद्रासहित स्विकारला पुरस्कार….
——————-
वसमत :
——————-
वसमत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सिताराम म्यानेवार यांना त्यांनी केलेल्या गोसेवा व गोरक्षणाच्या उल्लेखनीय कार्याची दामाजी एक्स्प्रेस या वृत्तपत्राने दखल घेऊन त्यांना बुधवारी ता.३० राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे पुरस्कार स्विकारताना व्यासपीठावर चंद्रा (कालवड) उपस्थित होती.
वसमत येथील सिताराम म्यानेवार हे वसमत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून भारतीय जनता पक्षाचे सक्रीय पदाधिकारी आहेत. आपली राजकीय भूमिका वटवत असताना त्यांचे सामाजिक काम वाखन्याजोगे आहे. गोरगरीब, वंचितांसाठी त्यांची अहोरात्र सेवा सुरू असते. त्याबरोबरच गोसेवा व गोरक्षणाचे मोठे कार्य त्यांचे हिंगोली जिल्ह्यात पहायला मिळते. मुख्यताह आजारी असलेल्या गायी व इतर जनावरांना स्वखर्चाने उपचार करण्यापासून त्यांचे कार्य सुरु असते. त्यांच्याकडे चंद्रा नावाची कालवड असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी संपन्न झालेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चंद्रासोबत दर्शनाचा लाभ घेतला. तसेच अनेक ज्योतिर्लिंग व देवस्थान येथे चंद्राचे दर्शन घडवून आणले.
या गोसेवा व गोरक्षणाच्या कार्याची मुंबई येथील दामाजी एक्स्प्रेस या वृत्तपत्राने दखल घेत त्यांची राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी निवड केली होती. बुधवारी ता.३० मुंबई येथे आयोजित सोहळ्यात मान्यवांच्या हस्ते त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी पुरस्कार स्विकारताना व्यासपीठावर चंद्रा उपस्थित होती. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त मान्यवर…
आनंद शिंदे मुंबई (गायन) , सिताराम म्यानेवार हिंगोली (गोसेवा) , अँड शरद बनसोडे मुंबई (विधी) , सुशांत शेलार मुंबई (अभिनेता) , किशोर महाबोले ठाणे (अभिनेता) , तुकारामबाबा महाराज सांगली (सामाजिक) , प्रा.डाँ लक्ष्मण ढोबळे मंगळवेढा (शिक्षक) ,प्रा.शिवाजीराव काळुंगे मंगळवेढा (सहकार) , सदानंद हजारे मुंबई (अर्थ) , प्रसाद कुलकर्णी पुणे (उद्योग) , प्रा.प्रदिप पाटील सांगली (साहित्य) , मंदार जोशी मुंबई (पत्रकार) , विजय साळुंखे सोलापूर (सांस्कृतिक) , प्रा येताळा भगत मंगळवेढा (क्रीडा) , अँड श्रीराम चौधरी पुणे (विधी) , नितिन इंगोले सांगोला (उद्योग) , विनायक यादव मंगळवेढा (सरपंच) , विनोद राऊत मंगळवेढा (उद्योग) , करुणा शिवशरण मोहोळ (उद्योग) , विकास यादव कुर्डुवाडी (शिक्षणसेवा) , बाबुराव हिप्परगी बार्शी (शिक्षणरत्न) , महादेव बनसोडे ठाणे (सामाजिक) , संजय अदाटे मंगळवेढा (कृषी) आदींचा समावेश आहे.
सिताराम म्यानेवार यांचा राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.
