
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, बिगर व्यावसायिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा..
——————–
प्रतिनिधी :
——————-
राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील सन 2025-26 करिता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करावयाच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी झाल्याने, वसतिगृह प्रवेशासाठी पुरेसे अर्ज प्राप्त न झाल्याने, प्रवेश अर्ज करताना येणाऱ्या अडचणी उद्भल्यामुळे या प्रवेशप्रक्रियेसाठी बिगर व्यावसायिक, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकास 26 ऑक्टोबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
स्वयंम व आधार योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शपथपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याबाबतचे शपथपत्र, प्रतिज्ञापत्र, विद्यार्थी आई-वडिलांसोबत राहत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शिक्षण घेताना कोणतीही नोकरी, व्यवसाय करणार नाही याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शासकीय वसतिगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडीत दिनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठो विचारात घेतले जातील.
शासनाकडून देण्यात आलेल्या विहित कालावधीत दि. 26 ऑक्टोबर, 2025 पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील सर्व इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याध्यांनी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजने अंतर्गत प्रवेश मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकांनी केले आहे.
