श्री स्वामी पालखीचे स्वागत, दर्शन, पूजन ,भिक्षाअर्पण सेवेत सहभागी होण्याचे आवाहन..
——————
प्रतिनिधी :
—————–
श्रीक्षेत्र कारंजा लाड ते श्रीक्षेत्र गाणगापूर ही भव्य पालखी रथयात्रेचे गुरुवारी ता.६ वसमत येथे आहे. या पालखी रथयात्रेचा वसमतकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
परभणी येथून ही पालखी रथयात्रा वसमत शहरात दाखल होईल. गुरुवारी दुपारी ०४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पालखी रथाचे आगमन होईल. तेथून मोंढा, मामा चौक, बुधवार पेठ, खीरणीचे झाड, शहरपेठ, सत्यनारायण टॉकीज, सत्याग्रह चौक, झेंडा चौक या मार्गे ही पालखी रथयात्रा सरस्वती मंदिर येथे सायं ०६ वाजता पोहोचेल. या पालखी मार्गात सर्व भाविकांनी श्री स्वामींच्या पालखी रथाचा भाविकांनी यथोचित स्वागत व पूजन सेवेचा लाभघ् यावा.
सायं ०६ते रात्रौ . ८:३० वाजेपर्यंत श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरण पादुका दर्शन, पूजन, भिक्षा अर्पण इत्यादी सेवा सरस्वती मंदिर झेंडा चौक येथे होईल. श्री स्वामी महाराजांना भिक्षा अर्पण करण्याची अपूर्व संधी वसमतकरांना चालून आली आहे. सरस्वती मंदिर येथील पारायणात मागितलेल्या भिक्षे व्यतिरिक्त वसमतकर इतर धान्य व द्रव्य स्वरूपातील भिक्षा येथे अर्पण करू शकतात.
सरस्वती मंदिर येथे प.पू.श्री मकरंद महाराज (पिठाधीपती, श्री क्षेत्र दत्तधाम, परभणी) यांचे प्रवचन, पंचपदी व प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. वसमतकरांनी श्री स्वामी महाराजांच्या पालखीचे स्वागत, दर्शन, पूजन, भिक्षा अर्पण सेवेत सहभागी व्हावे व पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री स्वामी कृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन वसमत येथील गुरुतत्त्व प्रदीप परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


